महिला बाबत सरकार संवेदनशील नाही — कॉम्रेड स्मिता पानसरे
भारतीय महिला फेडरेशन वर्धा जिल्हा अधिवेशन संपन्न
वर्धा — भारतीय महिला फेडरेशन वर्धा जिल्हा अधिवेशन २६ ऑगस्ट २०२३ आयटक कामगार केंद्र सभागृहात सारिका डेहनकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.
अधिवेशनाचे उद्घाटन प्राध्यापक नूतन मांडवी यांनी सावित्रीबाई फुले यांच्या फोटोला मला पण करून व महिलांच्या व्यथा मांडून उद्घाटन केले
यावेळी भारतीय महिला फेडरेशन राज्य सचिव लता भिसे पूणे. विरुडचे सरपंच एडवोकेट दुर्गाप्रसाद मेहरे आयटक राज्य सचिव दिलीप उटाणे, अनिसचे राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार आयटक जिल्हाध्यक्ष मनोहर पचारे आयटक जिल्हा सचिव वंदना कोळणकर भारतीय महिला फेडरेशनच्या जिल्हाध्यक्ष द्वारका इमडवार यांची उपस्थिती होती
*महिला बाबत सरकार संवेदनशील नाही असे मत भारतीय महिला फेडरेशन राज्य अध्यक्ष कॉम्रेड स्मिता पानसरे* त्या मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या
त्यामुळेच महिलावरती अत्याचार वाढत आहेत महिलांच्या नावावर सरकार नवीन नवीन योजना जाहीर करते परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही. जे व्यक्ती महिलावर अत्याचार करतात त्यांच्यावर कठोर कार्यवाही करण्याचे कायदे संविधानाने दिलेले असून सुद्धा त्या गुन्हेगारावर कार्यवाही होत नाही हे फार खेदाची गोष्ट आहे पैलवान मुलीवरती एका खासदारांनीच अत्याचार केले तो खासदार सरकारच्या मुख्य व्यक्तीच्या मांडीला मांडी लावून बसतो मग कशी होणार कार्यवाही?
मणिपूर महिला अत्याचार याप्रमाणेच अनेक गुन्हे घडून देखील सरकार मात्र झोपेचा सोंग घेऊन काम करीत आहे
महागाई वाढली बेरोजगारी वाढली याबाबत सरकार बोलत नाही पुरोगाम व साहित्यिकांची हत्या केली जाते त्यांचे मारेकरी सापडत नाहीत इत्यादी उदाहरण देऊन स्मिता पानसरे यांनी महिल वरती होत असलेले अत्याचार सर्व स्तरातील महिलांनी एकत्र येऊन मुकाबला करण्याची गरज आहे असेही मत भारतीय महिला फेडरेशनच्या राज्य अध्यक्ष स्मिता पानसरे अहमदनगर यांनी व्यक्त केले
या अधिवेशनात विविध ठराव पास करण्यात आले तर मागील तीन वर्षाचे अहवाल वाचन व प्रास्ताविक जिल्हा अध्यक्ष द्वारका इमडवार यांनी केले
तर संचालन माया तितरे यांनी केले
पुढील तीन वर्षासाठी जिल्हा कार्यकारणी निवड करण्यात आली
*अध्यक्ष* द्वारका इमडवार, उपाध्यक्ष अनुराधा उटाणे सारिका डेहनकर सचिव विजया पावडे सहसचिव महिना उईके मंगला इंगोले कोषाध्यक्ष अरुणा नागोसे तर कार्यकारणी सदस्य भारती मसने कविता लोहट कुंदा सावरकर वंदना कोळणकर अलका भानसे कुसुम कुटेमाटे जोशना राऊत सुनिता टिपले शोभा तिवारी माया तितरे पुष्पा शंभरकर प्रणिता मोहनकर जोशना मुंजेवार प्रमिला वानखेडे सुनीता म्हैसकार अनिता भोयर जय मला बेलगे अर्चना वाघमारे शबाना खान सुषमा ढोक गोदावरी राऊत ज्ञानेश्वरी डंबारे सोनाली पडोळे इत्यादींची निवड करण्यात आली
आभार प्रदर्शन जिल्हा सचिव विजया पावडे यांनी केले