शाशकीय

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचे मदतनीस व परिचर वेतनापासून वंचित

Spread the love

 

आपल्या दवाखान्याचे मदतनीस व परिचर यांना वेतन देऊन आपले पण, दाखवण्याची गरज.

घाटंजी तालुका प्रतिनिधी -सचिन कर्णेवार.
१ मे रोजी मोठ्या थाटात जनतेच्या हितासाठी सूरू करण्यात आलेल्या आपला दवाखाना मा. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेच्या यांच्या नावाने जनतेच्या हितासाठी व जनसेवा करण्याच्या दृष्टीने सुरु करण्यात आला मात्र याच दवाखान्याच्या कामात मदतनीस व परिचर यांचे दवाखाना लागल्या पासून चे घाटंजी तालुक्यातील वेतन अद्याप पर्यंत मिळालेले नसल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.’जनसेवा हीच ईश्वर सेवा’ समजत आधीच अतिशय तूटपुंजी वेतन घेत कामकरणारी मदतनीस व परिचर यांना वेतनापासून वंचित राहावे लागत आहे; यात जनसेवा करायची कसी? हा प्रश्न उपस्थित होतो आहे. हीच परिस्थिती जिल्ह्यातील सर्व आपल्या दवाखाना बाबतची नसावी! म्हणजे देव पावला.आपल्या दवाखाचे नांदेड येथिल एका खाजगी कंपनीच्या माध्यमातून मदतनीस व परिचर यांचे पगाराची जिम्मेदारी असून त्या संदर्भात कंपनीने दिलेल्या अधिकारी वर्गास फोन केला असता फोनही नॉट रिचेबल दाखवत असल्यामूळे सदर कामावरील मदतनीस,परिचर आर्थिक संकटात सापडले असून या गंभीर बाबीवर आरोग्य विभाग वरिष्ठ अधिकारी व जिल्हाधिकारी यांनी जातीने लक्ष देऊन येत्या गणेशोत्सव व ईतर सनाच्या आधी या कामगार वर्गास वेतन देऊन आर्थिक संकटातून सोडवण्याचा ‘श्रीगणेशा’ करावा ही मागणी होत आहे. यामुळे येत्या कालावधीत खरचं या गंभीर बाबीवर आरोग्य विभाग वरिष्ठ अधिकारी व जिल्हाधिकारी लक्ष पुरवेल का?हे अध्याप तरी अस्पष्ट आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close