विशेष

धक्कादायक ….  तालिबानी नेत्याची समलैंगिक संबंधाची चित्रफीत व्हायरल

Spread the love

नवी दिल्ली / नवप्रहार मीडिया 

             तालिबान हा आपल्या कडक कायद्यासाठी ओळखला जातो. आपल्या कडे जर एखाद्या व्यक्तीने कडक कायदे केले तर संतापून त्याला ‘ हा काय इकडे तालिबानी कायदा लावतो काय ? ‘ असे उपहासाने म्हटले जाते. अश्या देशात जर कोणी कायदा मोडत असेल तर त्याला परमेश्वर देखील वाचवू शकत नाही. आणि हा कायदा जर तेथे शासन चालवणाऱ्या व्यक्तीकडून मोडला जात असेल तर मग विचारता ओटी नसते.येथील एका नेत्याची तरुणासोबत संबंध बनवत असल्याची चित्रफीत व्हायरल झाली आहे. त्यावर काय कारवाई झाली हे सध्या समजू शकले नाही.

 तालिबान मध्ये नियम मोडणाऱ्यांना कडक शिक्षा दिली जाते. आधी कधी तर ती इतकी क्रूर असते की ऐकले तरी अंगावर शहारे उभे राहतात. अनैक महिलांना क्रूरपणे शिक्षा देणारे तालिबानी नेते मात्र या सर्व नियमांना बगल देत असल्याचे समोर आलं आहे. महिलांवर विविध निर्बंध लादणाऱ्या तालिबानच्या एका ज्येष्ठ नेत्याच्या कृत्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. तालिबानच्या एका प्रमुखे नेत्याचा एक खळबळजनक व्हिडीओ समोर आला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका धक्कादायक व्हिडिओमध्ये, तालिबानचा उपप्रमुख आणि काबुलमधील दा अफगाणिस्तान ब्रेश्ना शेरकतचा (DABS) प्रमुख मुल्ला अहमद अखुंद याने त्याच्या अंगरक्षकासोबत समलैंगिक संबंध ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एका गादीवर मुल्ला अहमद अखुंद एका तरुणासोबत समलैंगिक संबंध ठेवत असल्याचे म्हटलं गेलं आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

कथित व्हायरल व्हिडिओमध्ये मुल्ला अहमद अखुंद याच्यासोबत झोपलेला तरुण हा त्याचा अंगरक्षक आहे. अफगाणिस्तान इंटरनॅशनलने दिलेल्या वृत्तानुसार या 21 वर्षीय अंगरक्षकाने ब्रेश्ना शेरकतमध्ये मुल्ला अहमद अखुंदसोबत काम केले होते. या संघटनेचा उपसंरक्षण मंत्री मुल्ला फाजील याच्यासोबतही हा तरुण दिसला होता. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता त्याची जगभरात चर्चा सुरु झाली आहे.

दुसरीकडे, हा व्हिडीओ समोर आल्यापासून तालिबानचे नेतृत्व आणि त्यांचे संबंध यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. बहुतेक तालिबानांनी किशोरावस्थेपासून समलैंगिक संबंध ठेवले आहेत. अफगाण समाजात मुलांवर अत्याचार करणे सामान्य आहे. तिथे बालविवाह ही एक सामान्य प्रथा आहे. हा एक कुजलेला समाज आहे. मदरशांमध्ये वयाच्या नवव्या वर्षापासून मुलांशी गैरवर्तन केले जाते. त्यांना दाढी नसलेली मुलं आवडतात, अशा प्रतिक्रिया ट्विटर युजर्सकडून दिल्या जात आहेत.

 

 

दरम्यान, सोशल मीडियावर कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतरही तालिबान नेतृत्वाने मुल्ला अहमद अखुंदला कोणतीही शिक्षा दिलेली नाही. तसेच त्याला त्याचे काम करण्यास सांगितले आहे. दुसरीकडे ह्युमन राइट्स वॉच आणि आउट राइट ऍक्शन इंटरनॅशनलने जारी केलेल्या जानेवारी 2022 च्या अहवालात असेही म्हटले आहे की समलिंगी, उभयलिंगी याशिवायही भिन्न लैंगिक भावना बाळगणाऱ्या अफगाणी व्यक्तींच्या जीवाला तालिबानी राजवटीत धोका आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close