सामाजिक

पिंपरी चिंचवड येथील श्री संत रुपलाल महाराज मंदिराला बच्चू कडू यांची सदिच्छा भेट

Spread the love

अंजनगाव सुर्जी, मनोहर मुरकुटे
अचलपूर तालुक्याचे आमदार तसेच दिव्यांग कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य यांचे अध्यक्ष माननीय श्री बच्चुभाऊ कडू यांनी नुकतीच बारी समाज विकास ट्रस्ट पिंपरी चिंचवड येथील संत संत शिरोमणी रुपलाल महाराज मंदिराला सदिच्छा भेट दिली, प्रसंगी भाऊंनी संत रुपलाल महाराजांना पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले व दीप प्रज्वलन आणि गणेश प्रतिमेचे पूजन केले. स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
याप्रसंगी आमदार बच्चू कडुं यांचा सत्कार बारी समाज विकास ट्रस्ट चे अध्यक्ष ओंकार काटोले यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला त्यावेळी मंचावर चांदूरबाजार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र याऊल, संचालक सतीश मोहोड, नगरसेवक विकास डोळस, बारी समाज विकास ट्रस्ट चे
अध्यक्ष ओंकार काटोले बारी समाज विकास मंडळ पुणे चे अध्यक्ष भानुदास दाभाडे, आदी मान्यवर उपस्थित होते, प्रसंगी अखिल भारतीय बारी समाज महासंघाच्या माध्यमातून शेगाव येथे १ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या महा अधिवेशनात ज्या मागण्या करण्यात येणार आहेत, त्यामध्ये
राष्ट्रसंत शिरोमणी रुपलाल महाराजांचे राष्ट्रीय स्मारक झाले पाहिजे. बारी समाजाला आर्थिक विकास महामंडळ मिळाले पाहिजे, पानवेल व पानपिंपरी या पिकाला विम्याचे कवच, सबसिडी तसेच हमीभाव या प्रमुख मागण्याबरोबर अनेक मागण्या आमदार बच्चू यांच्यासमोर मांडण्यात आल्या याप्रसंगी
या मागण्याचा पाठपुरावा राज्याचे मुख्यमंत्री शिंदे यांचे कडे करणार असे आश्वासन उपस्थित समाज बांधवांना कडू यांनी दिले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ओंकार काटोले यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहसचिव भारत बारी यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बारी समाज विकास ट्रस्टचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी अहोरात्र मेहनत घेतली. तसेच या कार्यक्रमाला बारी समाज विकास ट्रस्टचे बंधू भगिनींनी जास्तीत जास्त संख्येने हजर राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच विदर्भ मित्रमंडळातील सर्व कार्यकर्ते, छत्रपती संभाजी महाराज बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक व सर्व पदाधिकारी पुण्यओक अहिल्यादेवी होळकर स्मारक कमिटी, जग्गनाथ मंदिर आदी सामाजिक कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close