नास्तिक असलेले आस्तिकांच्या हस्ते सत्कार स्वीकारतील का?
दिनांक 27 ऑगस्ट रोजी चंद्रपूर येथे साहित्यसम्राट लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या 103 व्या जयंतीनिमित्त आयोजित सत्कार समारंभास अनेक कार्यकर्त्यांना प्रमुख अतिथी म्हणून बोलावण्यात आलेले आहे.
साहित्यसम्राटांची जयंती साजरी करत असताना, आवर्जून सांगावसे वाटते की पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून ती दलित कष्टकरी कामगारांच्या हातावर तरलेली आहे असे ठासून सांगणारे अण्णाभाऊ व माझा धर्म कोणता असा प्रश्न विचारणारी मुक्ता साळवे यांच्या विचाराला आपण कुठे घेऊन जात आहोत?
समाजामध्ये वावरत असताना फुले, शाहू, आंबेडकर, अण्णाभाऊ यांचे विचार समाजामध्ये रुजवत असताना आता महागुरूंच्या माध्यमातून समाज सुधारक समाजाला कोणती दिशा देते हो? यांना अण्णाभाऊ साठे यांची जयंती करण्याचा अधिकार आहे काय?
सत्काराला उत्तर सत्कारमूर्ती काय देतील ह्याकडे मात्र विचारवंताचे लक्ष लागलेले आहे.
माझा भाऊ अनिल वानखडे (बी.कॉम.)
उपसरपंच ग्रामपंचायत घुईखेड तालुका चांदुर रेल्वे जिल्हा अमरावती तसेच महाराष्ट्रामध्ये चळवळी मध्ये सक्रिय असलेले, नामांतराच्या लढ्यात लढणारे व आंबेडकरी विचारवंत माझे आतेभाऊ नवनीतजी महाजन व यवतमाळ येथील सामाजिक कार्यकर्ते देविदास जी महाले, व सामाजिक कार्यकर्ते सागर कळणे या सत्कार कार्यक्रमाला जातील का हाही एक प्रश्नार्थी विषय आहे. समाजामध्ये फुले, शाहू, आंबेडकर मानणारा वर्ग तज्ज्ञ श्री प्राध्यापक बाळकृष्ण सरकटे, प्राध्यापक संजय जी नाटकर, सामाजिक कार्यकर्ते हिवराळे सर, अभ्यासक तज्ञ माझा धाकटा विवेक दादा वानखडे यांनी समाजाला आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाज प्रबोधनाच कार्य कराव.
अरविंद वानखडे
जिल्हाध्यक्ष अनिस (दाभोलकर गट )
(शिवसेना पदाधिकारी)
सदस्य
साहित्यरत्न कला व सांस्कृतिक विकास फॉउंडेशन.