जळगाव जामोद येथे जागतिक छायाचित्र दिन साजरा
तालुक्यातील छायाचित्रकारांचे स्नेह मिलन व कॅमेरा पूजन
—————
प्रतिनिधि जळगाव जामोद
दिनांक 19:
जागतिक छायाचित्र दिनानिमित्त आज 19रोजी तालुकाभरातून व शहरातून आलेल्या व्यावसायिक छायाचित्रकारांनी स्नेहमिलन सोहळा व सहभोजन पार पडले.
सविस्तर वृत्त असे की जगभरात 19 ऑगस्ट हा दिवस जागतिक छायाचित्र दिन म्हणून साजरा केला जातो याचाच एक भाग म्हणून तालुक्यातील सर्व व्यावसायिक फोटोग्राफर बंधू यांनी एकत्र येत येथील वडशिंगी रोडवरील श्री महासिद्ध महाराज मंदिर सभागृहात कॅमेरा पूजन व स्नेहसंमेलन आयोजित केले
सुरुवातीला कॅमेरा पूजन पार पडून वरिष्ठ छायाचित्रकारांनी नवोदित छायाचित्रकारांना उचित मार्गदर्शन केले .तसेच व्यवसायातील बदलत्या संधी व चढउतार याविषयी साधक बाधक चर्चा केल्या गेली.
ही जागतिक दर्जाची कला जोपासने आज सोपे राहिले नाही,यासाठी अतिशय महागडे कॅमेरे आणून कायम अपडेट राहने फारच आवश्यक असल्याचा मत जेष्ठनी व्यक्त केले.
कार्यक्रम चा शेवट स्नेहभोज ने होऊन
पुढे सर्वजण फ़ोटौवाल्क साठी सातपुडयात रवाना झाले.
कार्यक्रम च्या वेळी तालुक्यातील
लकी भगत,आश्विन राजपूत,,अनिल पाटिल,शंकर कोथळकर, मुरलीधर सोनोने,अशोक जाधव,दिपक जाधव,प्रमोद ढगे ,किसना दाते,सतीष हागे ,ज्ञानेश्वर घोलप,व्यंकटेश धोरण,राम जाधव,अफसर मासरे,गोपाल उमरकर,क्षीरसागर सर,नंदू कोकाटे ,योगेश वानखडे,अनिकेत भगत,गणेश बावस्कर, सचिन घूळे,सुमित चव्हाण ,दिपक कुवारे,
इत्यादी शेकडो फोटोग्राफ़र ऊपस्थित होते.