Uncategorized

सकाळी विकायचा भाजी आणि रात्री करायचा आयएसआय साठी काम 

Spread the love

शामली / नवप्रहार मीडिया नेटवर्क 

     आपल्यावर कोणाला संशय घेऊ नये म्हणून आयएसआय एजंट कलीम भाजी विकायचा आणि रात्री युवकांना आयएसआय मध्ये जुळण्यासाठी प्रवृत्त करायचा . त्याने सहा राज्यातील तरुणांना यासाठी तयार केले असल्याचे एटीएस च्या तपासात समोर आले आहे.  त्याने लोकांना शस्त्र आणि पैशाचे आमिष दाखवून आयएसआयसाठी तयार केले होते.

दरम्यान, एसटीएफ आता या संपूर्ण प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहे. आयबी, एसटीएफने शामलीमध्ये तळ ठोकला आहे. शामली येथील मोहल्ला नोकुआन रोड येथे राहणारा आयएसआय एजंट कलीम हा भाजीपाला विकण्याचे नाटक करुन देशभरात आयएसआयचे जाळे मजबूत करण्याचे काम करत होता.

दुसरीकडे, कलीमच्या ताब्यातून जप्त करण्यात आलेल्या उर्दूमध्ये लिहिलेल्या कागदपत्रांवर आयएसआयचे कोडवर्ड आणि भारतीय लष्कराच्या ठिकाणांची माहिती असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यांच्या माध्यमातून तो देशभर प्रचार करायचा. सूत्रांनी सांगितले की, कलीमने पश्चिम उत्तर प्रदेशातील शामली, मुझफ्फरनगर, सहारनपूर जिल्ह्यांमधून आयएसआयची मोहीम सुरु केली होती. कलीम त्याच्या साथीदारांसह देशभरातील आयएसआयसाठी लोकांना जोडत होता.

तसेच, तो दिवसभर बाजारातून भाजी आणून दिवसभर भाजी विकायचा आणि रात्री व्हॉट्सअ‍ॅप वगैरेच्या माध्यमातून पोरांना आयएसआयसाठी तयार करायचा. अनेकवेळा तो यूपीबाहेर दिल्ली, राजस्थान, हरियाणा आणि उत्तराखंडमध्येही गेला आहे. जिथे तो तरुणांचा एक गट तयार करुन त्यांना आयएसआयसाठी तयार करायचा. कलीमने सहा राज्यांतील तरुणांना काही पैशांचे आमिष दाखवून भारतात जिहाद पसरवण्यासाठी तुम्हाला शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा आणि पैसे दिले जातील, असे सांगितले होते.

त्याचबरोबर, तो तरुणांना भारतात जिहाद करण्यासाठी प्रवृत्त करत होता. आयएसआयच्या मोहिमेदरम्यान तो तरुणांना शहीद होण्याच्या प्रार्थनेसारखे संदेश देत असे. एसटीएफ आणि आयबीने गुरुवारपासून शामलीमध्ये तळ ठोकला आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close