संम्मान राष्ट्रसेवाभाव जपणाऱ्यांचा ” तिक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटी चा अभिनव उपक्रम …
मुर्तिजापूर (प्रतिनिधी ) स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण , देशभक्ती पर गित आणि काव्य गायणा बरोबर च राष्ट्रसेवाभाव ह्रदयी बाळगणाऱ्या ( एन. सी. सी. आणि स्काऊट गाईड ) च्या विद्यार्थ्यांचा संम्मान करुन देशास वंदन करण्यात आले .
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे आपले दुसरे वर्ष साजरे करीत असतांना त्या प्रत्येक राष्ट्रप्रेमीस राष्ट्रसेवे ची प्रेरणा आणि प्रोत्साहन देता यावे . जेणे देशभक्ती , राष्ट्ररक्षेच्या भावने वाव मिळावा या उद्देशाने बालपणापासून च देशरक्षणाचे ध्येय बाळगुन एन. सी. सी. ला सहभागी होतात. असेच युवक युवती अनेक क्षेत्रात ” राष्ट्रसेवाभाव उरी जपतात ” . अश्या युवांचा सत्कार समारंभ मा. डा. सुगतजी वाघमारे यांच्या मार्गदर्शनात स्वातंत्र्य दिनाच्या पर्वावर आयोजित करण्यात आला होता.
या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यास प्रा. व्ही . आर .कांबळे , अध्यक्ष म्हणून मंगेश शिवणकर तर प्रमुख अतिथी म्हणून माजी सैनिक शेतकरी नेते सुरेश जोगळे , प्रा. प्रमोद राजंदेकर , सुपरिचित साहित्यिक प्रमोद पंत , तरुणाई फाउंडेशन अकोलाचे संस्थापक संदिप देशमुख , प्रा.विनायक वानखडे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल डाहेलकर यांनी केले , सुत्रसंचालन धनराज वानखडे , यांनी तर आभार मिलिंद इंगळे यांनी मानले .
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मनिषा तायडे , मुकुंद काळे , बाळुभाऊ गवई , यांनी प्रयत्न केले.
यावेळी श्रीकृष्ण अडसुळे , आकाश वानखडे , अभिजीत देशमुख , आदेश महाजन , सौ.संध्या डाहेलकर , मंगेश वाडेकर , आरती आवटे आदींच्या सह मुख्याध्यापक वानखडे आणि गोडन किड्स इंग्लिश कांव्हेट चा शिक्षकवृंद उपस्थित होता .