आध्यात्मिक

राष्ट्र बलवान,धैर्यवाण, सक्षम होण्याकरिता गौ, गंगा आणि नारी चा सन्मान आवश्यक…

Spread the love

 

श्रीमद् भागवत कथेचे पाचवे पुष्प ..

धामणगाव रेल्वे / प्रतिनिधी

श्री परशुराम महिला सेवा समिति द्वारा आयोजित भागवत कथा ज्ञान यज्ञाच्या पाचव्या दिवशी  धामणगाव नगरीत  कथावाचक पंडित सूरज शर्मा म्हणाले की, राष्ट्र बलवान,धैर्यवाण, सक्षम होण्याकरिता गौ, गंगा आणि नारी चा सन्मान आवश्यक आहे गौ सेवा सर्वश्रेष्ठ सेवा आहे गोमुत्र व  गाईचे दूध शिशु पासून तर वृद्ध अवस्थेपर्यंत मानवाला सुदृढ व सक्षम करत त्यामुळे गायीचे संरक्षण करने हे सुद्धा मानवाचे परम कर्तव्य आहे  याचा उल्लेख आपल्या सनातनी शास्त्रात पण आहे  ते म्हणाले की,सनातनी आणि संत कधीच अत्याचार सहन करीत नाही पंडीत शर्मा म्हणाले, श्रीराम व श्रीकृष्ण एकच अवतार आहेत लीला केवळ वेगवेगळ्या आहेत परंतु उद्धेश एकच उन्नती,सदमार्ग,सद्विचार मानव जीवनात संस्कार,संस्कृति चे जतन हे राम व कृष्ण च्या आचरणातुन आपल्याला मिळते

भागवत कथेचे  आयोजन १८ ऑगस्ट पर्यंत करण्यात आले असून १८ ला महाआरती व कथेचे समारोप होईल

छत्रपती श्री शिवाजी चौकातील आरोही रिसोर्ट येथे आयोजित कथे दरम्यान हर्षोउल्हासात ,राम जन्म, कृष्ण जन्म सजीव झांकी ,गोवर्धन पर्वत पूजन,नरसिंह अवतार,समुद्र मंथन,वराह अवतार,बालकृष्ण लिला सादर करण्यात आली संपुर्ण वातावरण वृंदावन मय झाले होते

पंडित शर्मा यांनी कथेत भजन गायिले

श्री परशुराम महिला सेवा समितीच्या शेकडो महिलांसह शहरातील धार्मिक व आध्यात्मिक महिला पुरुष उपस्थित होते

दैनंदिन भागवत कथेला भक्तांनी उपस्थित राहून मानव जीवन कसे असावे करिता राम कृष्ण लीला समजून घेऊन कृतार्थ व्हावे असे आवाहन व विनंती श्री परशुराम महिला सेवा समिति ने केली आहे

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close