सामाजिक
आझादी च्या अमृत महोत्सवा निमित्त गावकऱ्यांनी घातला नवीन पायंडा
धामणगाव रेल्वे / प्रतिनिधी
आझादी च्या अमृत महोत्सवा निमित्त देशात सगळीकडे ध्वजारोहना सोबत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्यातील विरुळ रोंघे ग्राम पंचायत मध्ये देखील विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यात गावकऱ्यांनी अनेक असे प्रशंसनीय आणि अभिनंदनीय निर्णय घेतले हेत. ज्याची पंचक्रोशीत चर्चा आहे.
धामणगाव तालुक्यातील वीरुळ रोंघे ग्रामपंचायत स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून गुण गौरव विद्यार्थिनी आरती अजय डहाके हिच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले गावामध्ये ग्रामीण भागातील समस्या तसेच पायाभूत सुविधा मिळण्यासाठी सरपंच उपसरपंच यांनी जनकल्याण की बात यामधून सरपंच रुपेश गुल्हाने उपसरपंच गोपाल मांडूळकर सर्व ग्रामपंचायत सदस्य वीरूळ रोंघे गावातील ग्रामीण भागात १५ ऑगस्ट ७६ व्या स्वातंत्र दिनानिमित्त जनकल्याण योजना सुरू केली आहे. यामध्ये ज्या मुली लग्न होऊन सासरी जातात त्या मुलीला माहेरची साडी सप्रेम भेट देणार आहे, गावामध्ये स्कॉलरशिप मध्ये प्रथम क्रमांक येणाऱ्या प्राप्त विद्यार्थ्याला १००१ च रोख बक्षीस देण्यात येईल, गावामध्ये होणाऱ्या अंत्यविधीसाठी सर्व सामान्य कुटुंबातील मयत व्यक्तीच्या अंत्यविधीच्या सामग्रीसाठी सामग्री देण्यात येईल, महिला बचत गटासाठी ड्रॉ सिस्टीमने उद्योगासाठी मशीन देण्यात येईल, ग्रामपंचायत मार्फत प्रत्येक गावातील कुटुंबाला वीस लिटर ची कॅन दहा रुपया प्रमाणे वर्षभर पुरवण्यात येईल, सैन्य दलामध्ये ज्या विद्यार्थ्यांची नियुक्ती होईल त्या विद्यार्थ्याला सरपंच मानधनातून एक हजार रुपयाचे प्रोत्साहन पर बक्षीस देण्यात येईल, ग्रामपंचायत वीरूळ रोंघे येथे वार्डामध्ये क्षारयुक्त फिल्टर मशीन बसवण्यात येत आहे. या सर्व योजना ग्रामपंचायत मार्फत राबविण्यात येणार आहे असा संकल्प सरपंच रुपेश गुल्हाने उपसरपंच गोपाल मांडूळकर यांनी केला
त्यावेळेस गावातील सर्व ग्रामपंचायत सदस्य पुष्पा डंबळे ,रंजना चौधरी, मंगेश गुल्हाने ,वैशाली राऊत ,प्रकाश रोंघे ,राधिका रोंघे ,प्रेमलता वर्मा, तसेच माजी सभापती पंकज वानखडे, उपसभापती भारत रोंघे, माजी पोलीस पाटील डॉ प्रमोद रोंघे, माजी सरपंच अतुल वाघ, माजी उपसरपंच पवन खुरपडे, माजी सरपंच गीता बुगल , हिरुबाई शेंद्रे, ज्ञानेश्वर सावंत, माधुरी रोंघे, वासुदेव वानखडे, राजकुमार खुरपडे ,मालोजी रोंघे, दीपक सरदार ,विजय चौधरी ,अशोकराव काळे, छोटू रोंघे ,अशोकराव पिल्लारे ,दिवाकर जोशी, सुरेश काळे, मोरेश्वर अजमिरे, अर्पित कावळे, दीपक काळे, शैलेश वाघ, सुनील भोयर, ग्रामसेवक केने साहेब, किशोर रोंघे, रामभाऊजी तुमसरे, हिम्मत वाघ, संदीप धांडे माध्यमिक प्रायमरी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक वृंद तसेच गावातील सर्व कर्मचारी गावातील प्रतिष्ठित व्यक्ती युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.