स्कूल ऑफ स्कॉलर्स प्राथमिक मंत्रिमंडळाचे गठन
धामणगाव रेल्वे / प्रतिनिधी
श्री दत्ताजी मेघे बाल कल्याण शिक्षण संस्था द्वारा संचालित स्कूल ऑफ स्कॉलर्स मध्ये मंत्रिमंडळाचे गठन मोठ्या उत्साहात करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये स्थानिक दत्तापूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सविता फुसे या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. सरस्वती मातेच्या पुजनाने प्रथम हा कार्यक्रम सुरू करण्यात आला. शाळेच्या मुख्याध्यापिका के साई नीरजा यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक सविता फूसे यांचे पुष्पगुच्छ व ग्रीटिंग कार्ड देऊन स्वागत करण्यात आले. हा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्ग दहावीची उन्नती हरवानी आणि मधुरा बोके या विद्यार्थ्यांनी केले . सर्वप्रथम या समारंभासाठी विद्यार्थ्याची निवणूक घेण्यात आली. आणि या निवडणुकीत विजयी विद्यार्थ्याचे मंत्रिमंडळ गठीत करण्यात आले. या वर्षाचे हेड बॉय केशव मुंधडा व रिंकल मानकानी यांना बॅजेस देऊन सन्मानित करण्यात आले होते. तसेच प्राथमिक मध्ये वाईस हेड बॉय , हाऊस कॅप्टन, व्हाईस हाऊस कॅप्टन, व्हाईस हेड गर्ल आणि व्हाईस हेड बाय इत्यादी देखील निवडले गेले. या विद्यार्थ्यांचे पण अध्यक्षांकडून सन्मान करण्यात आला.
प्राचार्य के साई नीरजा , पर्यवेक्षिका शबाना खान, समाजशास्त्र शिक्षक हर्षल मनोहर क्रीडा शिक्षक नितीन जाधव आणि मुस्कान कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सर्वांनी अथक प्रयत्न केले आणि कार्यक्रम यशस्वी केला.