धामणगाव रेल्वे
जटाधारी कावड यात्रा समितीच्या वतीने रुक्मिणीचे माहेरघर श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथून शेकडो तरुणांसह हर हर महादेव,ओम श्री शिवाय नमोस्तुभ्यम, ओम नमः शिवाय च्या गगनभेदी घोषणांनी निघालेल्या कावड यात्रेचे सोमवारी सकाळी १० वाजता आगमन होताच धामणगाव नगरीच्या वतीने हजारो नागरिकांनी भव्य दिव्य स्वागत केले यावेळी संपूर्ण वातावरण शिवमय झाले होते जणू भगवान शिव धामणगाव अवतरले असे भासत होते
धामणगाव नगरीच्या तरुणांनी रविवारी रात्री श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथे जाऊन वशिष्ठ नदीचे गंगा जल शेकडो कावड मध्ये भरून पहाटे कौंडण्यपूर वरून धामणगाव करिता पायदळ कावड यात्रा काढली धामणगावच्या श्री छत्रपती शिवाजी चौक येथे कावड यात्रा पोहोचताच धामणगाव शहराच्या हजारो महिला,पुरुष,बाल, वृद्ध जनतेमध्ये प्रचंड उत्साह निदर्शनास आला
श्री छत्रपती शिवाजी चौक येथे स्वागत झाल्यानंतर कावड यात्रा सिनेमा चौक, गांधी चौक,अमर शहीद भगतसिंग चौक, कॉटन मार्केट ते अयोध्या नगर चौक पासून जुन्या दत्तापुरातील श्री सराफ पार्क येथे पोहोचली रस्त्यात प्रत्येक ठिकाणी जणू धामणगाव नगरीत शिवचे आगमन झाल्याचे अनुभवास येत होते धामणगाव वासियांनी प्रचंड पुष्पवृष्टी, घरासमोर रांगोळ्या,पताका लावून स्वागत केले
सर्वच मुख्य चौकांमध्ये फराळ आणि चहाची व्यवस्था करण्यात आली सराफ पार्क येथे जटाधारी कावड यात्रेच्या समितीच्या सदस्यांनी तसेच नगरवासीयांनी शेकडो वर्ष पुरातन असलेल्या शिवच्या पिंडीवर वशिष्ठ नदीच्या गंगा जल ने अभिषेक करून गंगाजल शिवपिंडीवर अर्पण केले