स्थानिक नेर येथील जिवन विकास, जिजामाता कन्या व निवासी शाळेत मेरी माटी मेरा देश अभियान,डॉ राहूल हळदे यांचा कलासंच सहभागी,प्रेक्षकांनी दिली दाद.
नेर:- नवनाथ दरोई
दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार यांच्या सहयोगाने महाराष्ट्रामध्ये स्वतंत्रतेचा अमृत महोत्सवा निमित्ताने मेरी माटी मेरा देश व हर घर तिरंगा हे अभियान देशभर राबवल्या जात आहे. त्या अनुषंगाने डॉ. राहुल हळदे यांच्या कलासंचाने दिनांक 11 व 12 ऑगस्ट ला स्थानिक नेर शहरातील जीवन विकास शाळा,जिजामाता कन्या शाळा व अनुसूचित जाती समाज कल्याण शासकीय निवासी शाळेत तसेच दारव्हा तालुक्यातील माणिकराव ठाकरे आदिवासी आश्रम शाळा, राजश्री शाहू महाराज आश्रम शाळा, पद्मश्री रामसिंग बाणावत वीजेएनटी आश्रम शाळा येथे मुलांनी गोंधळ या लोककलेचे प्रस्तुतीकरण करून शाळेतील शिक्षकांची,विदयार्थ्यांची,पालकाची मने जिकली. विद्यार्थ्यांना कलेविषयी माहिती राहूल हळदे यांनी दिली.तसेच देशासाठी संकल्प करून मुलांना देश विकासाची शपथ दिली. यावेळी तेथील प्रागणात शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक मंडळी उपस्थित होते.सहाय्यक कलाकार म्हणून स्वराज भगत, रोहन त्रिपाठी , ईशांत राठोड, निशांत राठोड, राहुल भगत,प्रतिक्षा काकडे, पूर्वा चव्हाण, निधी चव्हाण, प्राप्ती भोयर, नंदिनी चव्हाण, भाग्यश्री भोयर, प्रीती चव्हाण, सविता राठोड, अर्चना चव्हान, राजू मडावी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी राहूल हळदे व किरण जवके यांनी अथक परिश्रम घेतले.