नगरपरिषद कंत्राटी कामगारांचे आमरण उपोशन
नगरपरिषद कंत्राटी कामगारांचे आमरण उपोशन*
************************
अंजनगाव सर्जी, मनोहर मुरकुटे
अंजनगाव सुर्जी येथील नगर परिषदे मधील कंत्राटी तत्वावर काम करणारे कामगारांनीआपला भविष्य निर्वाह निधी, विमा,समान काम समान वेतन जुन जुलै महीण्याचे मासीक वेतन, ई.पि.एफ चा भरणा ,दरमहा दि. ५ला वेतन साप्ताहीक सुटी ईत्यादी मागण्यांच्या मान्य न झाल्यामुळे अखील भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन समीती व विघ्नहर्ता कामगार संघाटनेने काम बंद आंदोलन करत नगर परीषद प्रशासना विरोधात दि.१२पासुन आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे. नगर परिषदे मधील कंत्राटी तत्वावर काम करणारे कामगारांनीआपला भविष्य निर्वाह निधी, विमा,समान काम समान वेतन जुन जुलै महीण्याचे मासीक वेतन, सप्टेंबर २०२२ते जुलै २०२३पर्यंतचे कालावधीत ई.पि.एफ चा भरणा ,दरमहा दि. ५ला वेतन,साप्ताहीक सुटी ईत्यादी रास्त मागण्यांच्या पाठपुरावा मागील तथा तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांकडे सतत केला होता गेल्या २८तारखेस आपल्या न्यायोचीत मागण्या पंधरा दिवसात पूर्ण न झाल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला असताना मागण्यांची दखल घेतल्यान गेल्यामुळे अल्प रोजंदारीवर काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या हक्कावर गदा अाणल्याचे दिसून आल्यावर कंत्राटी कामगारांनी भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे तालुकाध्यक्ष सचिन गावंडे यांच्यासह कामगार प्रतीनिधी हरीचंद्र वानखडे,कुणाल संमुद्रे,संदीप भोंडे,ईमरान यांचे सह दि.१२पासुन नगरपरिषद कार्यालयासमोर आमरण उपोषनास सुरवात केली असुन अखील भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन समीती व विघ्नहर्ता कामगार संघाटनेने वेतन, सप्टेंबर २०२२ते जुलै२०२३पर्यंतचे कालावधीतील ई.पी.एफ.भरणा,समान काम समान वेतन,नालीवाले झडाईवाले,सफाई कामगारांना समान वेतन या ईतर मागण्या मान्य होई पर्यत आमरण उपोषण सुरु ठेवण्याची इशारा दीला आहे.