टिप्पर ची ऑटोरिक्षाला धडक,ऑटो चालकाचा मुत्यु
वरूड/तूषार अकर्ते
पुसला येथून जवळच असलेल्या उराड फाट्याजवळ बुधवार दि.९ ऑगस्ट ला सकाळी ९.३० वाजता च्या दरम्यान रेतीवाहक टिप्पर व प्रवासी ऑटोची समोरासमोर धडक झाल्याने या अपघातात ऑटोचालकाचा घटनास्थळीच मुत्यु झाला आहे.
प्राप्त माहिती नुसार चिरकुट भाजीखाये (६०) रा.पुसला हा स्वतःचा प्रवासी ऑटो क्रमांक एम एच २७ बी डब्ल्यू ३२४७ ने युरिया खत घेवून उराड येथे जात असताना उराड फाट्याजवळ पांढूर्णा अमरावती महामार्गावरून वरूड कडे जाणाऱ्या रेतीवाहु डंपर क्रमांक एम एच २७ बी.डब्ल्यू २९६६ ने ऑटोरिक्षाला जबर धडक दिली.या अपघातात ऑटोरिक्षाचे दोन्ही बाजुचे गेट चपकले व ऑटोचा मागील वाहनाचा सुद्धा डाला तुटला तसेच या अपघातात ऑटो चालक चिरकुट भाजीखाये यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ ग्रामीन रूग्णालयात दाखल करण्यात आले परंतु डॉक्टरांनी त्यांना मुत घोषित केले.
या अपघातातील मुतकाच्या पत्नी वच्छला भाजीखाये हिने या बाबत शें.घाट पोलिस स्टेशन ला फिर्याद दाखल केली असता पोलिसांनी टिप्पर चालक सुभाष शिंगरू वरठी (३१) रा.पंढरी याचे विरूद्ध गून्हा दाखल केला असुन या प्रकरणी ठानेदार सतीश इंगळे यांच्या मार्गदर्शनात पोलिस तपास करीत आहे.