मुलीने स्वतःचे अपहरणाचे रचले नाट्य आणि कुटुंबियांना पाठवला अर्धनग्न व्हिडिओ पण ….

कानपूर / नवप्रहार मीडिया नेटवर्क
त्याचे दोघांवर जीवापाड प्रेम होते. त्यांनी ‘ जियेंगे तो साथ ,मरेंगे तो साथ ‘ अश्या आणाभाका देखील घेतल्या होत्या . त्यांनी पळून जाऊन लग्न करम्याचा बेत आखला होता. पण पळून जाऊन लग्न तर होईल पण खाणार पिणार काय ? याची चिंता असल्याने मुलीने त्यासाठी आपल्या वडिलांना फासण्याचा कट आखला .तिने औषध आणायचे असल्याचे सांगून वडिलांचे एटीएम मिळवले. आणि त्यांच्या खात्यातून इ हजार रुपये काढून ती प्रियकरा सोबत छु मंतर झाली. तिचे अपहरण झाले आहे आणि तिला सोडण्यासाठी 10 लाख रुपयांची खंडणी मागत आहेत. हे भासविण्या साठी तिने स्वतःचेअर्धनग्न व्हिडीओ काढत ते वडिलांना पाठवले आणि इथेच तिने घोडचूक केली त्यात ती आणि तिचा प्रियकर पूर्ण अडकले.
.
प्रेयसी आणि प्रियकर या दोघांनी मिळून अपहरणाची कहाणी रचली. प्रियकरासोबत पळून जाण्यापूर्वी शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही तरुणी जनता नगर चौकी भागातील प्रियकराच्या घरी गेली. आपले अपहरण झाले आहे असे तिला दाखवून द्यायचे होते. यासाठी तिने शक्कल लढवत स्वत:ला बांधून ठेवले आणि त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले.
यानंतर दुपारी चारच्या सुमारास ती औषध घेण्याच्या बहाण्याने घराबाहेर पडली. यावेळी पैसे नसल्याचा बहाणा करुन तिने वडिलांकडून एटीएम काढून घेतले. यानंतर तिने एसबीआयच्या एटीएममधून आठ हजार रुपये काढले आणि थेट प्रियकराचे घर गाठले. पुढे एका बॅगेत कपडे आणि काही सामान घेऊन तिने पळ काढला. यानंतर दोघेही चाकेरी येथे पोहोचले. रात्री 8.30 च्या सुमारास त्या दोघांनी मिळून व्हॉईस नोटसह व्हिडिओ पाठवला आणि अपहरण झाल्याचे सांगून आपल्या कुटुंबाकडे खंडणीची मागणी केली.
घरच्यांवर दबाव निर्माण करण्यासाठी, मुलीने अर्धनग्न अवस्थेत स्वत:चा व्हिडिओ पाठवला. घरातील सदस्य लवकर दबावाखाली येतील, असे तिला वाटले. अपहरणाची बाब समोर येताच आई-वडिलांसह नातेवाइकांना धक्का बसला. त्यांनी पोलिसांत यासंदर्भात तक्रार केली.
10 लाखांच्या खंडणीच्या तक्रारीवरून जेसीपी आनंद प्रकाश तिवारी यांनी अनेक पथके तयार करून तरुणीचा आणि तिच्या अपहरणकर्त्याचा शोध सुरू केला. चाकेरीतील फोनचे लोकेशन ट्रेस केल्यानंतर सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता, तरुणी आणि तरुण एकत्र दिसले. मात्र, चकेरी येथून ते बसने लखनौला रवाना झाले. 48 तासांत त्यांनी 484 किलोमीटरचा प्रवास केला. यावेळी वाटेत येणाऱ्या मंदिरांनाही त्यांनी भेट दिली.
या प्रेमी युगुलाने शुक्रवारी संध्याकाळ ते रविवार संध्याकाळपर्यंत सहा जिल्ह्यांतून 484 किलोमीटरचा प्रवास करून अपहरणाची कहाणी रचली आणि शेवटी पकडले गेले. कानपूरमधून पळून गेल्यानंतर दोघेही लखनौमधील हजरतगंज आणि मोहनलालगंज येथे राहिले. पोलिसांपासून वाचण्यासाठी ते सुलतानपूर, गोंडा, अयोध्या, बस्तीपर्यंत आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत भटकत राहिले.
अयोध्येतील रामाच्या निर्माणाधीन मंदिराला भेट दिली. आपली इच्छा पूर्ण होवो आणि नवीन आयुष्य सुरू व्हावे अशी प्रार्थना त्यांनी केली. पोलिसांपासून वाचण्यासाठी दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी फोन ऑन करून आपल्या कुटुंबीयांना सतत फोन करत होते आणि नंतर ते बंद करत होते.
पैशाअभावी आणि भीतीने चूक झाली
पैशाची कमतरता आणि पकडले जाण्याची भीती यामुळे जोडप्याने एक चूक केली, ज्याची त्यांना मोठी किंमत मोजावी लागली. लोकेशन बदलावे लागेल तेव्हाच फोन ऑन करायचा असे दोघांनी ठरवले होते. चकेरीतील अपहरणाची माहिती दिल्यानंतर दोघांनीही फोन बंद केला आणि ते लखनौला रवाना झाले. लखनौहून गोंडा मार्गे सुलतानपूरला जात असताना मेसेज केला आणि फोन केला.
मात्र दीड दिवस उलटूनही पैसे मिळण्याची चिन्हे दिसत नसल्याने त्यांनी पहिल्या दिवशी रविवारी दुपारी आणि नंतर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास वडिलांना फोन केला. बस्ती ते गोंडा दरम्यान दोन फेऱ्यांमध्ये हे फोन कॉल्स झाले. यामुळे एक पॅटर्न तयार झाला आणि तो पॅटर्न पकडून पोलिसांनी त्यांचा माग काढला आणि त्यांना पकडले.
मॅरेज सर्टिफिकेटची चौकशी
पोलिसांना तपासादरम्यान विवाह प्रमाणपत्र सापडले आहे. या प्रमाणपत्रासाठी तरुणाचा पत्ता कँट येथील आहे. तो बऱ्यापैकी जनता नगर चौकी परिसरात अनेक दिवसांपासून राहत होता. या घरात मुलीचीही सतत ये-जा असायची. सध्याचा पत्ता आणि नोंदणीचा पत्ता यामध्ये फरक असल्याने पोलिसांना शंका आली. आरोपी तरुणाने बनावट प्रमाणपत्र टाकून लग्नाची नोंदणी केली का? याचाही तपास पोलीस करणार आहेत.