एरंडगाव येथिल महात्मा फुले विद्यालयात सेवानिवृत्ती समारंभाचे आयोजन
घाटंजी तालुका प्रतिनिधी -सचिन कर्णेवार
तालुक्यातील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय एरंडगाव येथे ज्यांनी ३१ वर्ष ज्ञानदानाच कार्य निष्ठेने व प्रामाणिक पने केलं असे विद्यालयातील मुख्याध्यापक सुनील पुंडलिकराव वेले यांच्या सेवानिवृत्ती प्रसंगी निरोप व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. यावेळी बहुसंख्येने उपस्थित असलेला जनसमुदाय अत्यंत भाऊक झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुबोध शिक्षण प्रसारक मंडळ केळझरा चे अध्यक्ष किशोर भगत तर प्रमुख अतिथी म्हणून दिपाली गावंडे, सरपंच (एरंडगाव ) वैजयंती ठाकरे,सरपंच (इंझाळा),शप्रिया विरदंडे, सरपंच (पिंपरी),रमेश मादस्तवार सरपंच (डोर्ली),पोलिस पाटील सुभाषराव बारहाते,शीतल ठाकरे,विद्या कांबळे,हेमंत लढे तसेच विशेष अतिथी म्हणून सुबोध शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव धनंजय भगत,अध्यक्ष विजय भगत,डॉ राजकुमार भगत आदी उपस्थित होते.सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी मान्यवरांसह शालेय विद्यार्थ्यांनी आपले मनोगत मांडले. अध्यक्षांच्या हस्ते सुनील पुंडलिकराव वेले यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला .सोबतच जिल्हा परिषद शाळा एरंडगाव येथील सहाय्यक शिक्षक किसन काळे यांच्या सेवानिवृत्ती निमित्त विद्यालयातील कर्मचाऱ्यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला. एरंडगाव केंद्रातील केंद्रप्रमुख संजय तुरक यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. प्रसंगी उपस्थित प्रमुख अतिथिंच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
याप्रसंगी विद्यालयातील मनस्वी टोणपे, स्नेहा डब्बावार, श्रद्धा ठाकरे, सुचिता कुमरे, मानसी पांगुळ, भारती कस्तुरे, श्रुतिका ठाकरे आदी विद्यार्थ्यांनी मनोगते मांडली. त्यानंतर शाळेतील सहाय्यक शिक्षक रमेश ताटेवार व नरसिंग कोतपेल्लीवार, अनिल गावंडे यांनी सत्कार मूर्ती सुनील वेले यांचे जीवन कार्य व सेवा काळातील योगदान या संबंधी विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष किशोर भगत तसेच विशेष अतिथी धनंजय भगत यांनी मनोगतामध्ये सत्कारमूर्ती सुनील वेले यांच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. सोबतच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शितल ठाकरे,प्रफुल गावंडे,ज्योतिबा कानींदे, कश्यप भगत, पांडुरंग जरीले, प्रा. हेंडवे यांनी सुद्धा आपली मनोगत व्यक्त केले .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल गावंडे,संचालन मनोज साबापूरे तर आभार प्रदर्शन एन. डी. कोतपेल्लीवार केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महेंद्र देवतळे व इतरही मंडळींनी अथक परिश्रम घेतले.