धामणगाव रेल्वे स्टेशनचा पंतप्रधान मोदींच्या हस्ते आभासी शुभारंभ….
आमदार अडसड सह मान्यवर उपस्थित
धामणगाव रेल्वे, / प्रतिनिधि
रेल्वे मंत्रालयाच्या अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत धामणगाव रेल्वे स्थानकाचे नाव समाविष्ट असल्यामुळे
धामणगाव रेल्वे स्थानकावर रविवारी धामणगाव रेल्वे स्टेशन चे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आभासी पद्धतीने विकास कामांचे भव्य दिव्य आणि थाटात शुभारंभ व उद्बोधन झाले
याप्रसंगी आमदार प्रताप अडसड प्रामुख्याने उपस्थित होते
धामणगाव शहरातील रेल्वे स्थानकावर आयोजित “अमृत भारत फाउंडेशन महोत्सव” दरम्यान रेल्वे विभागाकडून आयोजित उपरोक्त कार्यक्रमात भव्य मंचावर आमदार प्रताप अडसड सह सीनियर डिव्हिजन इंजिनियर संदीप वर्मा एस डी एम जोगी तहसीलदार वसीमा शेख सत्कारमूर्ती कॅप्टन महाजन रमेश साखरकर धामणगाव विधानसभा प्रमुख रावसाहेब रोठे शहराध्यक्ष गिरीश भुतडा स्टेशन अधीक्षक जे डी कुलकर्णी ठाणेदार छेदीलाल कनोजिया प्रामुख्याने उपस्थित होते या फाउंडेशन महोत्सवाचे प्रास्ताविक संदीप वर्मा यांनी केले याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे थेट दिल्लीवरून आभासी पद्धतीने उद्बोधन झाले यावेळी धामणगाव रेल्वे स्टेशन वर आयोजित कार्यक्रमात प्रचंड संख्येने महिला पुरुष उपस्थित होते शाळांमध्ये व महाविद्यालयांमध्ये आयोजित चित्रकला, बौद्धिक व अन्य स्पर्धा यामधून प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान तसेच शहरातील नामवंत व राष्ट्र कार्यात सहभागी असलेल्या कॅप्टन अशोक महाजन वर सुद्धा रमेश साखरकर यांचा सत्कार करण्यात आला शेषराव लवटे रेल्वे समितीचे सदस्य कमल संघानी अर्चना राऊत दिनेश मुंदडा सुनील साकुरे दिनेश बोबडे अशोक शर्मा,विनोद धुर्वे यांचाही रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी महोत्सवात सन्मान केले रेल्वे सल्लागार समितीने सीनियर डिव्हिजन मेकॅनिकल इंजिनिअर संदीप वर्मा व स्टेशन प्रबंधक जे डी कुलकर्णी यांचे यावेळी सत्कार केले
——————————————
मोदींचे शतशः आभार- अडसड कल्याणकारी योजना राबवून देशाचा सर्वांगीण विकास घडविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी निरंतर प्रयत्न करीत आहेत
देशाच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी काळात पंतप्रधान मोदीं द्वारे अमृत भारत स्टेशन योजना अमलात येत आहे या योजनेअंतर्गत धामणगाव रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास केला जाणार आहे ज्यामुळे या रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार असून रेल्वे प्रवेशांना अत्याधुनिक सुविधा व लाभ मिळणार आहे धामणगाव रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी १९ कोटी २८ लक्ष रुपयांचा निधी केंद्र शासनाने मंजूर केला आहे यवतमाळ जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या धामणगाव रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास होणार ही आपल्याकरिता गौरव व अभिनंदनिय असल्याचे आमदार प्रताप अडसड “अमृत भारत फाउंडेशन महोत्सव प्रसंगी” म्हणाले ते म्हणाले मोदी यांचे शतशः आभार
———————–
आमदार अडसडचे “मेरा रंग दे बसंती चोला”…उपरोक्त महोत्सवात मुकुंदराव पवार शाळेतील विद्यार्थ्यांनी राष्ट्रभक्तीवर उल्लेखनीय नाटिका सादर केली प्रेक्षकांच्या आग्रहास्तव याप्रसंगी आमदार प्रताप अडसड यांनी सुद्धा “मेरा रंग दे बसंती चोला” हे गीत प्रस्तुत केल्याने संपूर्ण वातावरण राष्ट्रमय झाले होते
——————————————
महोत्सवाचे संचालन रक्षित व आभार संदीप वर्मा यांनी व्यक्त केले