सामाजिक

अन.. ते दृश्य पाहून अनेकांनी टाकले तोंडात बोट

Spread the love

नवी दिल्ली / नवप्रहार मीडिया नेटवर्क 

                       काही प्राणी असे आहेत ज्यांचे नाव सुद्धा घेतले तर अंगावर काटे उभे राहतात. त्यातील किंगकोब्रा एक.  त्याने जर फणा काढला तर तो कोणावर आक्रमण किंवा बचावासाठी असतो.पण फणा काढलेल्या सापाला गाय चाटत असेल आणि किंगकोब्रा गपगुमान बसला असेल तर तुम्ही तोंडात बोटं टाकालच न अगदी तसेच या घटनेत झाले आहे या घटनेचा व्हिडिओ भारतीय वन सेवा अधिकारी सुशांत नंदा हे सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

नुकताच त्यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, जो सध्या चर्चेत आहे. या व्हिडिओमध्ये साप आणि गाय यांच्यातील प्रेम दिसत आहे. हे दृश्य खूपच आश्चर्यचकित करणारं आहे. कारण या दोन प्राण्यांमध्ये तुम्ही यापूर्वी असं काही पाहिलं नसेल.

व्हिडिओ शेअर करताना सुशांत नंदा यांनी लिहिलं – “या दृश्याचं वर्णन करणं कठीण आहे. हा विश्वास निखळ प्रेमाने जिंकला आहे.”व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक गाय उभी असल्याचं दिसत आहे. तिच्या समोरच जमिनीवर साप दिसतो.

सापाने ज्या पद्धतीने फणा काढला आहे, त्यावरून तो कोब्रा साप असल्याचं समजतं, ज्याची गणना जगातील सर्वात विषारी सापांमध्ये केली जाते. कोब्रा साप अगदी मोठ्या प्राण्यालाही चावला तरी काही मिनिटांतच त्याचा मृत्यू होऊ शकतो. मात्र या व्हिडिओमध्ये दोघांमध्ये भांडण नाही तर प्रेम दिसून आलं. व्यक्तीला भलतीच हौस, लाखो रुपये खर्च करुन बनला कुत्रा आणि…

पाहा सापाने फणा काढला आहे. तर समोर असलेली गाय त्याला आपल्या जिभेने चाटत आहे. मात्र तरीही साप अगदी शांत बसला असून तो हल्लाही करत नाही. या व्हिडिओला 1 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

तर अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने म्हटलं की ‘सुशांत जे बोलला ते अगदी बरोबर आहे. दुसरा यूजर म्हणाला की, गाय आणि साप या दोघांचं वागणं आपल्याला दिसतं, पण त्यांची स्वतःची एक भाषा आहे, जी माणसाच्या समजण्याच्या पलीकडे आहे. एका व्यक्तीने म्हटलं की, निसर्ग गुंतागुंतीचा आहे. अनुभवानेच तो समजून घेता येतो!

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close