शेती विषयक

घाटंजी तहसिल मार्फत शेतक-यांना ई-पिक नोंदणी बद्ल जनजागृती सुरु.

Spread the love

शेतकऱ्यांनी ई-पीक ॲप वर नोंदणी करावी तहसिलदार सेलोटकर यांचे आवाहन.

घाटंजी तालुका प्रतिनिधी -सचिन कर्णेवार

घाटंजी तालुक्यातील शेतकऱ्यांना सोईचे जावे तसेच खरीप हंगाम २०२३ पिक पाहणी नोंदणीसाठी ई-पीक पाहणीचे २.०.११ हे अपडेटेड व्हर्जन गुगल प्ले स्टोअर वर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे या बाबत माहिती सध्या तहसिलदार सेलोटकर विविध माध्यमांतून शेतकरी वर्गास पोहचवत असून एक प्रकारे शेतकरी जागृती करत आहे.तरी सर्व खातेदार शेतकऱ्यांनी नवीन व्हर्जन अपडेट करून घेऊन आवश्यक खरीप हंगामात प्रत्यक्ष ई-पीक पाहणी मोबाईल ॲप द्वारे पीक पाहणी करण्यासाठी १ जुलै २०२३ पासून सुरू करण्यात आले आहे. सर्व शेतकऱ्यांनी खरीप हंगाम २०२३ साठी दिलेल्या कालावधीमध्ये आपली ई-पीक पाहणी नोंदणी पूर्ण करावी जेणेकरून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यास शेतकरी वर्गास अडचण येणार नाही. पिकांचा विमा,नाफेड, कृषी उत्पन्न बाजार समिती,पिकाला हमीभाव,पीक कर्ज,नैसर्गिक आपत्ती सारख्या विविध शासकीय योजनांच्या लाभांकरीता ई-पीक पाहणी अत्यावश्यक आहे.आजच शेतकऱ्यांनी स्वतः बांधावर जावून मोबाईलद्वारे ई पीक पाहणी पूर्ण करून घ्यावी जेणे करून पिक नुकसान झाले तर, पेरा झालेल्या कुठल्या पिकाचे नुकसान झाले हे मोबाईल वर बघता येऊन शासनाच्या पिक नुकसानाचा लाभ घेण्यास मदत होईल असे आवाहन तहसिलदार घाटंजी यांच्याद्वारे करण्यात येत आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close