ब्रेकिंग न्यूज

घरी जायला साधन नसल्याने पठठया ने सरळ बसच चोरली ना राव ….!

Spread the love
घरी जायला गाडी नाही; प्रवाशी चक्क एसटी घेऊन गावाला पसार
घाटंजी बसस्थानकावरील प्रकार पोलीसात तक्रार
घाटंजी / सचिन कर्णेवार
घाटंजी -तालुका  हा दूर्गम भागातील अनेक खेड्यांना जोडलेला असून या तालुक्यातील जनतेची दळणवळणाची सोय व्हावी या उद्देशाने घाटंजी शहरात बससेवा व बसस्थानकाची निर्मिती केली आहे. घाटंजी या छोट्या शहरातून जिल्ह्याच्या ठिकाणी शासकीय,आरोग्य, शैक्षणिक सेवेसाठी दळणवळणाची साधने उपलब्ध व्हावी या उद्देशाने घाटंजी शहरात बसस्थानकावर यवतमाळ तसेच पांढरकवडा,राजुरा,किनवट सह अन्य डेपोच्या एसटी बस येथे मुक्कामी येऊन राहतात.चालक व वाहक यांच्या निवासस्थानाची येथे व्यवस्था आहे.तेव्हा बाहेर ठिकाणावरून मुक्कामी आलेल्या एसटी बस बसस्थानकावर लावून चालक व वाहक तिथे मुक्काम करतात.
                   दि.१ ऑगस्ट रोजी रात्रीच्या वेळी वाहक व चालकाने शेवटची फेरी घेऊन घाटंजी गाठली गाडीतील सर्व प्रवासी उतरवून नंतर बस बसस्थानकावर लावून जेवण करण्यासाठी गेले जेवणा नंतर झोपण्यापूर्वी सोबत आणलेल्या सतरंजी,चादर आणण्यासाठी गाडीकडे चालक व वाहक गेले असता बसस्थानकावर लावून असलेली ती बस गायब असल्याचे त्यांचे लक्षात आले तेव्हा गाडीची शोधाशोध केली परंतु गाडी दिसून आली नाही तेव्हा एसटी महामंडळाच्या कर्मचारी यांनी घाटंजी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असता घाटंजी पोलीसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून त्वरित तपास सुरू केला असता एका प्रवाशाने घरी जाण्यासाठी कुठलेही वाहन उपलब्ध नसल्याने बसस्थानकावर लावून असलेल्या एसटी महामंडळाची यवतमाळ आगाराची बस एम.एच. 40 एन 9140 क्रमांकाची गाडीचं घेऊन गेल्याची माहिती मिळाली. तेव्हा माहिती आधारे त्या रस्त्याने जाऊन एसटी बस चा शोध घेतला व सदर बस घेऊन जाणारा आरोपी हुसेन लोणकर रा.वाकी दुधाना ता.जी.यवतमाळ याला पोलिसांनी ताब्यात घेतले. प्रवाशाने चक्क एसटी बस चोरण्याचे हे अजब प्रकरण नेमकं काय?. व कारण कोणते?  ही माहिती पोलिस शोधात असून चक्क एसटी बस चोरून नेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे हे विशेष.या प्रकरणाने मात्र एकावे ते नव्वलचं हे प्रत्येक ममाहीतगार लोकांच्या तोंडुन येत आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Check Also
Close
Back to top button
Close
Close