पोलिसांच्या गुप्त तपासात झाला भलताच उलगडा

पुणे / नवप्रहार मीडिया नेटवर्क
एका महिलेने पोलिसात तिचा पती चक्कर येऊन पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले होते. पण पोलिसांना यावर शंका होती. त्यामुळे पोलिसांनी महिलेच्या हालचालीवर पाळत ठेवून गुप्त तपास सुरू केला होता. त्यानंतर पोलिसांना जे कळले त्यामुळे पोलिसही चक्रावले. वास्तविक पाहता महिलेचा पती चक्कर येऊन पडला नव्हता आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाला नव्हता तर त्याला महिलेकडून सतत होणाऱ्या मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
घटना पुणे जिल्ह्यातील दौड तालुक्यातील चौफुला नवागावं येथील आहे. सोन महिन्यांनापूर्वी कामाच्या शोधात पल्लवी पवार आणि संतोष पवार हे पती-पत्नी या ठिकाणी राहायला आले होते. संतोष याला दारूचे व्यसन असल्याने पत्नी पल्लवी त्याला वारंवार समजावून सांगून ही तो दारू पिणे कमी करत नव्हता.
संतोष पुन्हा दारू पिऊन घरी आला. यावेळी चिडलेल्या पत्नी पल्लवीने त्याला काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. हातापायावर मारहाण होत असतानाच एक फटका पती संतोष त्याच्या डोक्याला लागला होता. यामध्ये तो गंभीर जखमी झाला होता.
त्यानंतर त्याची तब्येत खालावली. दोन दिवसांनी त्याला अशीच मोठी चक्कर आल्याने त्यास ससून येथे नेले. मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले. त्याचा आकस्मित मृत्यू झाला असावा, असे सर्वांना वाटत होते. तशी माहिती यवत पोलिसांना देण्यात आली
असे असताना मात्र यवत पोलीस ठाण्याचे केशव वाबळे यांना हा प्रकार संशयास्पद वाटल्याने त्यांनी पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार बाळासाहेब गाडेकर, टीमच्या साह्याने अधिक तपास सुरू केला. यामध्ये त्यांना काही गोष्टी संशयास्पद वाटल्या.
त्यांना संतोष याचा मृत्यू पत्नी पल्लवीने केलेल्या मारहाणीत झाल्याची गुप्त माहिती मिळाली. दरम्यान संतोष याचा श्वविच्छेदनाचा अहवाल ही आला. सदर अहवालात संतोषचा मृत्यू डोक्याला मार लागल्याने झाल्याचे नमूद करण्यात आले.