क्राइम

नेर पोलीस स्टेशनच्या हद्दीत, अवैधरीत्या घातक अग्न्नीशस्त्र बाळगणारे दोन आरोपी ताब्यात,

Spread the love

 

एक देशी बनावटी पिस्तूल व तीन जिवंत काडतुस जप्त,स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाई
नेर:-नवनाथ दरोई
नेर पोलीस स्टेशन परिसरात अवैध अग्नीशस्त्र बाळगत असल्याची गोपनीय माहिती यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ.पवन बन्सोड यांना मिळताच त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांना आदेश दिला. पोलीस अधिक्षकाच्या आदेशाची अंमलबजावणी करत, त्यांनी गुन्हे शाखेच्या आधीनस्त पथकांना अवैद्य अग्निशस्त्र ईसमा बाबत योग्य माहिती काढून कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. दिनांक 29/ 7 / रोजी स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ येथील पथक ने पोलीस स्टेशन परिसरात पेट्रोलिग करत असताना संबंधितांकडून गोपनीय माहिती मिळाली की आयटीआय कॉलेज जवळील बायपास चौफुलीवर दोन ईसम असल्याची माहिती मिळताच गून्हे शाखेने सापळा रचला.सदर ठिकाणी जाबीर खान वायात खान वय 25 राहणार नबाबपुरा तालुका नेर जिल्हा यवतमाळ,निमीचंद धरमसेठ पवार वय 34 राहणार आठवडी बाजार हे दोघेही ईसम संशयास्पद स्थितीत कुठल्यातरी व्यक्तीची वाट पाहत असल्याचे निदर्शनात आले. सदर ईसमाच्या कमरेला क्षेत्रासारखे काही तरी असल्याचे दिसून आल्याने त्यांची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता अंगझडतीत एक देशी बनावटी पिस्तूल, व मॅक्झिन मध्ये तीन जिवंत काडतूस व दोन विवो कंपनीचे मोबाईल पुराव्यासह जप्त करण्यात आले.आरोपी विरुद्ध नेर पोलीस स्टेशनला भारतीय हत्यार कायदा अन्नवे गुन्हा नोंद करण्यात आला.आरोपी करून जप्त केलेल्या मुद्द्यामाल नेर पोलीस स्टेशनला कारवाईस्तव ठाणेदाराच्या ताब्यात देण्यात आला. सदर कारवाई यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ.पवन बनसोड, अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी दारव्हा आदित्य मिरखेळकर, आधारसिंग सोनवणे यांच्या मार्गदर्शनात गणेश वनारे, बबलू चव्हाण, किशोर झेंडेकर, मिथुन जाधव,आमित झेंडेकर, जितेंद्र चौधरी यांनी यशस्वीरित्या मिशन पार पाडले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close