त्याने पुराच्या पाण्यात थेट बसच टाकली न राव व्हिडीओ पाहून तुम्हीही द्याल शिव्या
जगातील काही देशात पूरपरिस्थिती आहे .शासन जनतेला वेळोवेळी त्या बद्दल सूचना करत असते. पुराचे पाणी धोक्याच्या पातळीच्या वर वाहत असतांना पूल ओलांडू नये अश्या सूचना लिहल्या असतात. असे असतांना देखील अनेक लोक धाडस दाखवून आपले आणि आपल्या सोबतच्या लोकांचे जीव धोक्यात टाकतात. असाच एक व्हिडीओ सामोआमधून समोर आला आहे,
दरम्यान सामोआमधून एक हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, येथे चालक प्रवाशांनी भरलेली बस पाण्याच्या जोरदार प्रवाहाच्या आत घेऊन क्रॉस करू लागतो. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, पाणी एवढ्या वेगाने वाहत आहे की, काही वेळातच ते बस प्रवाहासोबत वाहून जाते. प्रवाशांनी भरलेली बस पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून जाते. यादरम्यान बसमध्ये उपस्थित प्रवाशांच्या किंकाळ्या स्पष्ट ऐकू येतात. काही वेळातच अर्ध्याहून अधिक बस पाण्यात बुडून वाहू लागते. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, बस ज्या बाजूला वाहत आहे, त्या बाजूला दूरपर्यंत फक्त पाणीच दिसत आहे.
अंगावर काटा आणणारा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून गाडीच्या ड्रायव्हर टिका करत लोकांनी संताप व्यक्त केला आहे.