शासनाकडून येणारा औषध साठा पशु पालकांना उपलब्ध करून द्या.
वरूड/तूषार अकर्ते
बेनोडा येथील पशुवैद्यकीय रूग्णालयासाठी शासनाकडून मिळणारा औषधसाठा गेली पाच वर्षा पासून उपलब्ध झाला नाही. त्यामुळे या भागातील पशुपालकांना मोठ्या अडचणीना सामोरे जावे लागत आहे. खनिज मिश्रण, कॅल्शियम लिक्विड, सल्फा डिमीडिन इंजेक्शन, मँगनेशियम सल्फेट, टिंचर मिनरल पावडर या औषधांचा पुरवठा मागील पाच वर्षापासून बेनोडा पशुवैद्यकीय रूग्णालयाला होत नसल्याने या रूग्णालया अंतर्गत येणा-या बारगाव, गोरेगाव, जामगाव, पळसोना, मांगोना, नागझिरी, माणिकपूर, धामणदस, खडका, पांढरघाटी इत्यादी गावांना याचा त्रास सोसावा लागत आहे. त्यामुळे बेनोडा व इतर खेडे गावातील पशु पालक पशुच्या औषधीसाठी मागील पाच वर्षापासून वंचित राहिल्याचे दिसत आहे.वेळेवर औषध उपलब्ध होत नसल्यामुळे अनेक जनावरांना आपले प्राण गमवावे लागत आहे.त्यामुळे शासनाकडून मिळणारा औषधसाठा पशु पालकांना लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी पशु पालक नागरिकांनी वरूड पंचायत समिती मध्ये गटविकास अधिका-यांकडे निवेदनातून केली आहे.