पुरपिडीतांना तात्काळ मदत करून सावंगी येथील शिक्षकाने दिली माणूसकीची शिकवणूक.
घाटंजी तालुका प्रतिनिधी -सचिन कर्णेवार
सध्या पावसाने सगळीकडे हाहाकार माजला असून संपूर्ण राज्यात पुरपरिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले. अशात घाटंजी तालुक्यातील सावंगी गाव सुद्धा पूरपरिस्थिती तून सुटले नाही. पैनगंगा व वाघाडी नदीचे संगम असलेल्या सावंगी गावाला पुराच्या पाण्याने वेडा घातल्यामुळे अनेक नदीकाठच्या घरात पाणी शिरले. त्यामूळे अनेक कुटुंबतील जनजीवन विस्कळीत झाले होते अशात सावंगी येथील शिक्षक गजानन जंगले यांनी माणूसकीचे शिक्षण देत या सर्व पुरपिडीतांना शाळेमध्ये सुरक्षित स्थळी राहण्याची व्यवस्था करून दिली. सोबतच पुरपिडीत व त्यांचे कुटुंबातील लोकांना अल्पोपहारासह स्वघरी बनविलेला स्वयंपाक आणून देत जेवण व्यवस्था केली.अती नुकसानग्रस्त काहींना कपडे,किराणा घेऊन दिले त्यामुळे तेथील पुरपीडित लोकांनी समाधान व्यक्त केले. शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिकवण देतांना माझाच वावरताना सामाजिक बांधिलकी जोपासून माणुसकी शिकवणही या मानवतावादी शिक्षकाने दिली त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.