क्राइम

या कारणामुळे तिने गुप्तांगात ठेवली होती सुसाईड नोट 

Spread the love

मुंबई / नवप्रहार मीडिया नेटवर्क 

               हुंड्यासाठी महिलांचा छळ ही काही नवीन बाब नाही. माहेरून पैशे आणण्यासाठी अनेक महिलांना मारझोड सह अनेक वेदना दिल्या जातात.माहेरची परिस्थिती त्यांना माहिती असल्याने महिला त्रास सहन करतात पण माहेरच्यांना काहीच सांगत नाहीत.सासरची मंडळी माहेरून पैशे आणण्यासाठी त्रास देत असल्याने नवविवाहितेने आत्महत्या केल्याची घटना घटना घडली आहे. मुख्य म्हणजे तिने मृत्यूपूर्वी जी सुसाईड नोट लिहुन ठेवली होती.ती गुप्तांगात लपवून ठेवली होती.त्या मागे हे कारण असल्याचे समोर आले आहे.

नेरुळ सेक्टर २७ येथील साईकृपा सोसायटीत हा प्रकार घडला आहे. तिथे राहणाऱ्या साक्षी (नाव बदललेले) या नवविवाहितेने रविवारी राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली होती. याप्रकरणी तिचे पती व सासू विरोधात नेरुळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत विवाहितेचे तिचे मामांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साक्षी हीच विवाह नेरूळच्या शशी बामणे याच्यासोबत ३ जूनला झाला आहे. लग्नानंतर काही दिवसातच पती शशी व सासू शकुन यांच्याकडून तिचा कारसाठी छळ सुरु झाला होता. कार खरेदीसाठी माहेरून पैसे घेऊन ये यासाठी तिच्यावर दबाव टाकत तिचा छळ देखील केला जात होता. याबाबत तिने कुटुंबियांना कल्पना देखील दिली होती.

अशातच काही दिवसांपासून तिला माहेरच्या व्यक्तींपासून बोलण्यास अडवले जात होते. त्यासाठी पतीने तिचा मोबाईल देखील ताब्यात घेतला होता. अखेर रविवारी पहाटेच्या सुमारास तिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी नेरुळ पोलिस ठाण्यात धाव घेऊन तिच्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती देत पती व सासू विरोधात पोलिसांकडे तक्रार केली.

गुप्तांगात आढळली चिट्टी

कारसाठी साक्षीचा होणारा अमानुष छळ तिला सहन होत नव्हता. यामुळे तिने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्येचा निर्णय घेतला. मात्र आपला छळ करणाऱ्या पती व सासूवर कठोर कारवाईची इच्छा तिने चिट्ठीमध्ये लिहून ठेवली होती. आत्महत्येनंतर ही चिठ्ठी पतीच्या हाती लागल्यास नष्ट केली जाऊ शकते. यामुळे तिने ती चिठ्ठी गुप्तांगात लपवून ठेवली होती. आत्महत्येनंतर पंचनाम्यांदरम्यान हि चिठ्ठी तिच्या गुप्तांगात आढळून आली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close