मंडल यात्रा व ओबीसी जागृती अभियान निमित्त घाटंजीत आढावा बैठक संपन्न.
घाटंजी तालुका प्रतिनिधी – सचिन कर्णेवार
घाटंजी तालुका ओबीसी जनमोर्चा संघटनेच्या वतीने नुक्तेच ओबीसी समाज जनजागृती आणी ३० जूलै रोजी सूरु होत असलेल्या मंडल दिनाच्या निमित्ताने ओबीसींच्या हक्कासाठीच्या मंडल यात्रा संदर्भात सर्व ओबीसी जनमोर्चा पदाधिकारी आढावा बैठक शिंपी समाज भवन येथे घेन्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी ओबीसी जनमोर्चा ता.अध्यक्ष मा. सतिश मलकापूरे होते तर,तज्ञ मार्गदर्शक मा.उमेश कोरमि यांनी ४ ऑगष्ट रोजी घाटंजीत दाखल होत असलेल्या मंडल यात्रामधे केल्या जाणाऱ्या मागण्या ह्या ओबीसी समाजाला न्याय हक्कासाठी जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. विद्यार्थ्यांसाठी ७२ वस्तीगृह व २१ ,६०० विद्यार्थ्यांना स्वाध्याय योजना लागू झाली पाहिजे. सर्व व्यावसायिक अभ्यासक्रम मधे १००% बी माफी व्हावी. तात्काळ शिक्षक भरती झाली पाहीजे.स्वामिनाथन आयोग लागू करा ह्यासारख्या मागण्या संदर्भात सविस्तर माहिती उपस्थितांना दिली.होणारी मंडल यात्रा ही ओबीसी समाजाच्या उत्थानासाठी आहे अध्यक्षांनी बोलतांना मत व्यक्त केले. सभेला ओबीसी नेते ज्ञानेश्वर रायमल, विश्वनाथ वाघमारे,मनोज सूरसे घाटंजीतील सामाजिक कार्यकर्ते मधूकर निस्ताणे,मोरेश्वर वातीले,अनंत चौधरी, महेश पवार,चंद्रशेखर नोमूलवार,संजय दिकूंडवार, विलास कठाणे उपस्थित होते. सभेचे आयोजन व संचालन तालूका सचिव सचिन कर्णेवार यांनी केले तर उपस्थितांचे आभार संजय दिकुंडवार यांनी मानले.