गुन्हेशाखा, युनिट क. ०१, यांची कामगिरी : – घरफोडी करणारे दोन आरोपींना अटक
प्रतिनिधी अमित वानखडे
दिनांक २४.०१.२०२३ चे रात्री ११.५० वा. ते दि. २५.०१.२०२३ चे सकाळी १०.०० वा. चे दरम्यान पो. ठाणे हुडकेश्वर हद्दीत, लवकुश नगर, प्लॉ.नं. ९६, मानेवाडा रिंगरोड, नागपुर, येथे राहणारे फिर्यादी डॉ. लिलाधर विठोबा कुर्जेकर वय ६३ वर्ष, हे नमुद ठिकाणी वरचे माळयावर राहत असुन, खाली त्यांचे ग्रिनलँड रेस्टॉरंट अॅड बार आहे. रात्री बार चे शटरला कुलुप लावुन ते वरचे माळयावर झोपले असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे रेस्टॉरंट अॅड बार चे बेसमेंटमध्ये असलेले शटर्सचे लॉक तोडुन आत प्रवेश करून, रेस्टॉरंट अॅड बार मधुन वेगवेगळया दारूचे बॉटल्स, सी. सी. टी. व्ही. चा डी. व्ही. आर. व नगदी ५०,०००/रू असा एकुण १,७९,८४० / रू चा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पो.ठाणे हुडकेश्वर येथे अज्ञात आरोपी विरूध्द कलम ४५४, ४५७, ३८०, भादवि अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता..
गुन्हयाचे संमातर तपासात गुन्हे शाखा युनिट १ चे अधिकारी व कर्मचारी यांनी मिळालेल्या खात्रीशिर गुप्त बातमीदाराचे माहिती वरून सापळा रचुन आरोपी १) राकेश दिलीप दास, वय ३१ वर्ष, रा. महाजनवाडी, वानाडोंगरी, एम.आय.डी.सी २) अनुप सुधिर पाटील वय ३१ वर्ष रा. प्लॉट न. ४३, शुभम नगर, हिंगणा रोड, नागपूर यांना ताब्यात घेवून त्यांची सखोल विचारपूस केली असता आरोपींने वर नमुद गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपींना नमुद गुन्हयात अटक करण्यात आली. आरोपींचे ताब्यातुन गुन्हा करतांना वापरलेला थ्रिसीटर अॅटो किमती ८०,००० /- रू चा जप्त करण्यात आलेला आहे. आरोपींना मुद्देमालासह पुढील कार्यवाहीस्तव हुडकेश्वर पोलीसांचे ताब्यात दिलेले आहे.
वरील तिन्ही कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे शाखा, मा.पोलीस उप-आयुक्त, (डिटेक्शन), मार्गदर्शना खाली पो. नि. अनिल ताकसांडे, पोहवा नुतनसिंग छाडी, बबन राउत, विनोद देशमुख नापेअ. रविद्र राउत, मनोज टेकाम, शुशांत सोळंके, सोनू भावरे, अमर रोठे, हेमंत लोणारे, योगेश सातपुते, रितेश तुमडाम यांनी केली आहे. यांचे