एस ओ एस कब्स येथे रेड डे उत्साहात साजरा
धामणगाव रेल्वे / प्रतिनिधी
श्री दत्ताजी मेघे बालकल्याण शिक्षण संस्था द्वारा संचालित स्कूल ऑफ स्कॉलर्स कब्स मध्ये रेड डे मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला. सर्व विद्यार्थी व शिक्षिका लाल रंगाच्या वेशभूशेत आले होते. विदयार्थ्यांनी टिफिन मध्ये लाल रंगाचे फळ, व खाद्यपदार्थ आणले होते. विद्यार्थ्यांनी लाल रंगाच्या वेगवेगळ्या वस्तु आपल्या सोबत आणल्या होत्या तसेच विदयार्थ्यांना लाल रंगाबद्दल माहीती देण्यात आली. लाल रंगाशी सम्बधित विविध प्रकारच्या ऍक्टिव्हिटी घेण्यात आल्या होत्या.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठीशाळेच्या प्राचार्या के. साई निरजा व पर्यवेक्षिका शबाना खान यांच्या मार्गदर्शनाखाली प्रणिता जोशी, रेणुका सबाने, वर्षा देशमुख, सारिका चिंचे, हर्षिता श्रीवास, वृषाली काळे, हर्षदा ठाकरे, पूजा मांडोकार व सुप्रिया ढोपाटे यांनी अथक प्रयत्न केले.