यवतमाळ जलमय , सकल भागात पाणी साचले
प्रशासनाचे युद्धपातळीवर मदतकार्य
यवतमाळ / अरविंद वानखडे
मागील काही दिवसांपासून बरसणाऱ्या कोसळधार पावसामुळे जिल्यातील नदी, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. शहरातील रस्त्यांना नदी चे स्वरूप आले आहे. लोकांच्या घरात पावसाचे पाणी घुसले आहे. सकल भागात तर परिस्थिती फार विदारक आहे. नागरिकांचे हाल पाहता प्रशासनाने युद्धपातळीवर मदत कार्य सुरू केले असल्याचे समजते.
दिनांक 21-07-2023 यवतमाळ येथील धुआधार पावसाने हाहाकार केला असून आर्णी रोड परिसरात अक्षरशः रस्त्यावरून पाणी ओलांडताना नदीचे स्वरूप पाहवयस मिळाले साईश्रद्धा हॉस्पिटल तसेच अनेक दुकानामध्ये पाणी घुसले असून जण जीवन विस्कळीत झाले असून सर्व सामान्यांचे फार मोठे नुकसान झालेले आहें.
तसेच यवतमाळ परिसरात उमरसरा व गोदामफईल या परिसरात सुद्धा अनेकांच्या घरात पाणी घुसले आहे. परिसराच्या नदी नाल्याना पुर आल्यामुळे परिस्थिती गंभीर आहे यवतमाळ येथे जिल्हाधिकारी अमोल येडगे सर यांनी शाळेला सुट्टी दिली जिल्ह्यातील जनतेला सतर्कतेचा इशारा दिला आहे.