अप्पर वर्धा जलाशयातुन ७ दरवाज्यातून विसर्ग सुरू, वर्धा नदीकाठच्या गावांना प्रशासनाने दिला सतत तिचा इशारा
मोर्शी( संजय गारपवार)
अप्पर वर्धा जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसापासून सततधार सुरू असून जलाशयात येणाऱ्या माळू नदी ,दमयंती नदी ,वर्धा नदी , जाम नदी , चुडामण नदी ,सतत पुर सुरू असल्याने जलाशयाच्या पातळीत पाण्याची झपाट्याने वाढ झाल्याने शुक्रवारी सायंकाळी सात वाजता अप्पर वर्धा जलाशयाचे सात वक्र दरवाजे उघडण्यात आले असून वर्धा नदी पात्रात विसर्ग सुरू असल्याने वर्धा नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
31 जुलै अखेर जलाशयात पाण्याची ३४१.२० मीटर धरणातील पाण्याचा तालंक , धरणातील उपयुक्त पाण्याचा साठा 452.66द ल घ मी, टक्केवारी 80.25 पाहिजे असून 21 जुलै रोजी धरणातील पाण्याचा साठा ३४०.२० मीटर इतकी आहे. धरणातील उपयुक्त पाण्याचा साठा ३८३.४२ , आणि धरणातील पाण्याची टक्केवारी 68% झाले आहे.