सामाजिक

भुकेलेली मगर गेली सिंहाच्या शिकारीवर ताव मारायला आणि ……

Spread the love
नवी दिल्ली / नवप्रहार मीडिया नेटवर्क 
         म्हामतात न की पोटाची भूख माणसाला काहीही करायला लावते. तसेच प्राण्यांचे देखील आहे. कारण मनुष्य असो वा पशु पॉट संगळ्यांनाच लागले आहे. तर एका भुकेल्या मगरीच्या आणि शिकार करून व त्यावर ताव मारून आरामात बसलेल्या सिंहाचा हा किस्सा आहे.

भुकेने कासावीस झालेंक्या मगरीचने सिंहाच्या क्षेत्रात घुसून तिने सिंहाची शिकार पळवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जे घडलं ते थरारक आहे. सिंह आणि मगरीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. एका मगरीने सिंहाच्या हद्दीत घुसून त्याची शिकार पळवण्याचा प्रयत्न केला. हे संपूर्ण दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता सिंहांनी आपली शिकार करून ठेवली आहे. एका म्हशीला त्यांनी ठार केलं आहे. इतक्यात तिथं एक भुकेली मगर येते.

ती सिंहांच्या शिकारीवर तोंड मारण्याचा प्रयत्न करते. त्याचवेळी सिंह पाहतात आणि तिच्या जवळ येतात.  पाण्यात मगरीचं राज्य त्यामुळे तिथं सिंहही तिला घाबरतो. पण जंगलात जमिनीवर मात्र सिंहच राजा, त्यामुळे इथं तो मगरीला घाबरला नाही. आधी एका आणि नंतर दुसऱ्या सिंहाने मगरीला पळवण्याचा प्रयत्न केला. नंतर दोघांनीही मगरीला घेरलं आणि एकएक करून मगरीवर हल्ला करू लागले. मगरही त्यांच्यासमोर कमी पडली नाही ती एकटी दोन सिंहांशी झुंज देत राहिली.

जंगलात एकाच शिकारासाठी भिडलेल्या दोन शिकाऱ्यांमधील लढाईचं हे थरारक दृश्य पर्यटकांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला. यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.  युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. एका युझरने हा व्हिडीओ पाहिल्यावर सिंह खरोखरच जंगलाचा राजा आहे, असं म्हटलं आहे. तर एकाने मगरीच्या हिमतीलाही दाद दिली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close