हटके

अन वरा ऐवजी त्याच्या पित्याशी झाले तिचे लग्न 

Spread the love

ऑस्ट्रेलिया / नवप्रहार मीडिया नेटवर्क 

                           लग्नात घाई गडबड ही बाब आलीच. या घाई गडबडीत काही वेळा शुल्लक चुका होतात. त्या हास्याचे कारण देखील बनतात.पण लग्नाच्या घाईत तुम्ही कधी असं ऐकलं आहे काय की मुला ऐवजी त्याच्या वडिलांशी ( वधूच्या सासरे ) लग्न झाल्याचे ऐकले आहे काय तर आज आम्ही आपणाला अश्याच एका गमतीशीर प्रसंगाबद्दल सांगणार आहोत. ऑस्ट्रेलियातील हे प्रकरण आहे.                 

ऑस्ट्रेलियातील लोकप्रिय ब्रेकफास्ट रेडिओ शो ‘फिट्झी अँड विप्पा विथ केट रिची’च्या होस्टला एका महिलेचा कॉल आला. किम असं तिचं नाव. शोमध्ये तिने तिच्या लग्नाचे विचित्र किस्से सांगितलं. तिच्या लग्नाची स्टोरी ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटले आणि हसायलाही भाग पाडलं.

 महिलेने सांगितलं की, तिनं आणि तिच्या पतीने कोर्ट मॅरेज करण्याचा विचार केला होता. त्यांना दोन साक्षीदारांची गरज होती. अशा परिस्थितीत तिची आई आणि मुलाचे वडील साक्षीदार म्हणून आले होते.

आधी मुलाची आई येणार होती, पण नंतर तिने पतीला साक्षीदार होण्यास सांगितलं. जेव्हा ते लोक न्यायालयात गेले तेव्हा त्या सर्वांनी कागदपत्रांवर स्वाक्षरी केली. पण तिथंच एक चूक झाली. नवरदेवाने त्याला जिथं सही करायची होती तिथं केली.

त्यानंतर साक्षीदारांनी सह्या करायच्या होत्या. त्यासाठी त्याचे वडील सही करायला गेले. पण त्यांनी साक्षीदाराच्या जागेऐवजी नवरदेवाच्या सहीजवळ सही केली. म्हणजेच किमने दोन पुरुषांशी लग्न केला.

ज्यापैकी एक तिचा सासरा होता.  इंडिया टाइम्स वेबसाइटच्या वृत्तानुसार, रोडिओ शोचे होस्ट देखील किमची कहाणी ऐकून आश्चर्यचकित झाले. मात्र यानंतर किमने सर्व काही स्पष्ट केलं. कायदेशीर कागदपत्रांवर नव्हे तर सासरच्यांनीच मॅरेज सर्टिफिकेटवर सही केली असल्याचं ती म्हणाली. म्हणजे मॅरेज सर्टिफिकेटवर सासराही सुनेचा नवरा आहे. पण लग्नाशी संबंधित कायदेशीर कागदपत्रांवर सासरच्यांची सही नाही.

What’s your Reaction?
+1
1
+1
0
+1
0
+1
2
+1
1
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close