कृ.उ.बा.समितीत पीक विमा अर्ज भरण्या साठी विनामूल्य शिबिर.
वरूड/तूषार अकर्ते
वरूड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने तालुक्यातील शेतकऱ्यांकरीता सन् २०२३ च्या पिकाकरीता शेतकऱ्यांना पीक विमा काढायचा आहे. या पीक विम्याकरीता सर्व शेतकरी बांधवांना त्रास होऊ नये व पीक विमा अर्ज भरणे सोयीचे व्हावे या उद्देशाने दि.२१ जुलै रोज शुक्रवार पासून सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पीक विमा अर्ज भरणे व या संदर्भात मार्गदर्शन करून अर्ज विनामूल्य भरून मिळणार आहे. तरी वरूड तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी ज्या शेतातील पिकांचा पीक विमा काढायचा आहे त्या शेताचा सात बारा, आधारकार्ड झेरॉक्स प्रत, बँक पासबुक झेरॉक्स प्रत, स्वंयम घोषणा पत्र ही कागद पत्रे घेऊन कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयात यावे तसेच शेतक-यांना तलाठी उपलब्ध न झाल्यास किंवा काही अडचणी उद्भवल्यास कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सातबारा शुल्क २५ रुपये भरून सातबारा उपलब्ध करून देण्यात येईल व घोषणा पत्र सुद्धा विनामूल्य उपलब्ध याच ठिकाणी करून देण्यात येईल. अर्ज वीना मूल्य भरून देण्यात येईल याचा लाभ सर्व शेतकरी बंधूंनी घ्यावा असे आव्हान पंचायत समितीचे माजी सभापती विक्रम ठाकरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्र उर्फ बबलू पावडे, उपसभापती बाबाराव मागुळकर व सर्व संचालक मंडळाने केले आहे.