नांदगाव तालुक्यात ढगफुटी ; पिकासह माती गेली वाहून
शेतकऱ्यांचे जबरदस्त नुकसान
पावसाची तीव्रता ईतकी की जमिनीखाली टाकलेले पाईप पडले उघडे
शेतकऱ्यांना शासकीय मदतीची गरज
नांदगाव खंडेश्वर प्रतिनिधी /
काल दिनांक 18 जुलै 2023 रोजी झालेल्या ढगफुटी मुळे नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये अति प्रचंड प्रमाणात मध्ये शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे,पहिलेच पाऊस लेट आला,ज्या जा भागात पाऊस समाधान कारक आला आहे,त्या शेतकऱ्यांनी पेरणी केली,त्या पेरणीवर पाऊस आला नाही त्या मुळे शेतकऱ्यमा दुबारा पेरणी करावी लागली त्या मध्ये शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले,कसा बसा शेतकरी सवाराला तर काल रात्री झालेल्या ढगफुटी मध्ये तूरपाशी, तूर, कपाशी,मुंग व उडीद ह्या संपूर्ण पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे वाघोडा, शेलु, मंगरूळ चव्हाळा.हरणी.पाचुड.धानोरा, सुलतानपूर, खरबी, शिवनी, फुबगाव तसेच रोहना, पिंपरी गावंडा,गोडेगाव,सालोड, संपूर्ण तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे,तसेंच शेतकऱ्यांच्या शेतामधील ड्रीप,स्प्रिंकर पाईपा चे सुद्धा नुकसान झाले आहे शेतकऱ्यांचे शेतामधील ड्रीप जमिनी मधील दोन फूट आतमध्ये ड्रीप सुद्धा बाहेर निघालेली आहे एवढं पाणीझालेलं आहे. प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामे सुरु करून शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख एवढी मदत जाहीर करावी असे शेतकऱ्यांच्या वतीने सरकार कडे प्रशासनाच्या वतीने मांगणी करण्यात आलेली आहे.