क्राइम

दरोडा गुन्हयातील फरार आरोपी गजाआड

Spread the love

प्रतिनिधी अमित वानखडे

मा. पोलीस अधिक्षक सा. नागपूर ग्रामीण यांचे आदेशान्वये संपुर्ण जिल्हयात पाहिजे असलेले आरोपी यांची मोहीम सुरू असतांना मार्गदर्शनात सावनेर उपविभागात पाहिजे असलेल्या आरोपीचा शोध घेत असतांना गोपनीय बातमीदारांकडुन माहिती मिळाली की, पोस्टे कळमेश्वर येथील अप क्र २२४ / १२ कलम ३९५ भा. द. वी. मधील पाहिजे असलेला आरोपी नामे- राजेश उर्फ मामा व हरींचंद्र टेकाम, वय ४५ वर्ष, रा. चनकापूर ता. सावनेर जि. नागपूर हा त्याचे राहते घराजवळ चनकापूर (खापरखेडा) येथे राहत असल्याची माहिती प्राप्त झाल्याने सदर आरोपीचा शोध घेतला असता सदर आरोपी हा राहते घराजवळ चनकापुर (खापरखेडा) येथे मिळुन आला. सदर आरोपीस विश्वासात घेवुन विचारपुस केली असता सदर आरोपीने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यावरून सदर गुन्हयात आरोपीचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याची वैदकीय तपासणी करून पुढील कार्यवाही करिता पोस्टे कळमेश्वर यांच्या ताब्यात देण्यात आले.

सदरची सदरची कार्यवाही ही मा. पोलीस अधिक्षक श्री. विशाल आनंद, मा. अपर पोलीस अधिक्षक डॉ. संदिप पखाले यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक श्री. ओमप्रकाश कोकाटे, सहायक पोलीस निरीक्षक अनील राऊत, पोलीस हवालदार विनोद काळे, नाना राऊत, ईकबाल शेख, पोलीस नायक वीरू नरड, प्रमोद भोयर, पोलीस शिपाई अभिषेक देशमुख, चालक मोनू शुक्ला यांचे पथकाने केली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close