वरूड शहरातील युवकाची गळफास लावून आत्महत्या
वरूड/तुषार अकर्ते
शहरातील टेंभुरखेडा रोड वरील श्रीकृष्ण कॉलनी मध्ये राहत असलेल्या सागर बबन कांबळे (२४) या युवकाने आपल्या राहत्या घरातच गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना दि.१७ जुलै रोज सोमवार ला सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे.
हकीकत अशाप्रकारे आहे की मृतक हा आई-वडिलांसह राहत होता तो वडिलांच्या जागेवर अनुकंपा तत्वावर महिला व बाल विकास कार्यालय येथे नोकरीला होता.काल दि.१६ जुलै रोज रविवार ला सुट्टी असल्याने
तो घरीच होता व त्याचा भाऊ शेखर कांबळे (२८) हा सासरवाडीला गेला होता. त्याला दि.१७ ला सकाळी ६.३० वा दरम्यान त्याच्या आईचा फोन आला व आईने त्याला सांगितले की सागर ने घरच्या वरच्या मजल्यावरील खोलीतील व्हेंटिलेटरच्या खिडकीला दोरी बांधून गळफास घेतला आहे.असे कळताच तो वरुडला घरी आला व वरती जाऊन पाहिले असता त्याचा भाऊ सागर गळफास घेवुन मरण पावलेला दिसुन आला. त्याने गळफास का घेतला असावा या बाबत कुणालाच काही सांगितलं नाही व त्याच्या मरणरबाबत आमचा कोणावरही संशय नाही अशी फिर्याद त्याने पोलिसांत दिली या वरून पोलिसांनी मर्ग दाखल केला.
पोलीसांनी घटनास्थळ गाठुन मृतकाचा पंचनामा करून सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.शवविच्छेदनानंतर दुपारी शोकाकुल वातावरणात त्याच्या पार्थिव शरीरावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.