सामाजिक

तुम्ही देखील चिकन मटण खात असाल तर ही बातमी वाचाच

Spread the love

गाजियाबद (युपी) / नवप्रहार वृत्तसेवा

                 युपी च्या गाजियाबद येथील जगमल नावाच्या 85 वर्षीय व्यक्तीला मागील 2 वर्षांपासून खोकल्याचा त्रास होता. तो बिडी पित असल्याने त्यामुळे त्याला खोकला येत असावा असे जवळच्या व्यक्तींचे मत होते. त्यामुळे त्याने बिडी पिणे देखील सोडले होते. पण त्याचा खोकला काही केल्या कमी होत नव्हता. आरोग्याशी संबंधित अनेक तक्रारी उद्भवल्या होत्या. त्यांचे डोके सतत दुखत होते, त्यांना सतत खोकला येत होता. यामुळे त्यांच्या छातीत दुखत होते शिवाय श्वास घ्यायलाही त्रास होत होता. जगमल यांना खोकल्याची उबळ आल्यास त्यांच्या कुटुंबियांना त्रास होत होता.  त्यामुळे डॉक्टरांनी त्याच्या छातीचा स्कॅन काढला तेव्हा ते अवाक झाले . कारण त्यांना त्यांच्या फुफ्फुसात एक हाड अडकलेले दिसले

उत्तर प्रदेशातील गाजियाबादमध्ये राहणाऱ्या जगमल (85) वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाच्या फुफ्फुसात कोंबडीचे हाड अडकले होते. यामुळे त्यांना गेल्या 2 वर्षांपासून आरोग्याशी संबंधित अनेक तक्रारी उद्भवल्या होत्या. त्यांचे डोके सतत दुखत होते, त्यांना सतत खोकला येत होता. यामुळे त्यांच्या छातीत दुखत होते शिवाय श्वास घ्यायलाही त्रास होत होता. जगमल यांना खोकल्याची उबळ आल्यास त्यांच्या कुटुंबियांना त्रास होत होता. खोकला त्यांना अति धूम्रपान केल्यामुळे येत आहे, असे त्यांच्या कुटुंबियांना वाटत होते. यामुळे जगमल लपूनछपून धूम्रपान करत असत. दिवसेंदिवस जगमल यांची प्रकृती खालावत होती. त्यांच्या शारीरिक त्रासात वाढ होऊ लागली. यामुळे काही काळानंतर त्यांनी धूम्रपान करणेही सोडून दिले, मात्र त्यानंतरही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. त्यामुळे जगमल यांचे कुटुंबीय त्यांना घेऊन एका खासगी रुग्णालयात गेले.

वैद्यकीय तापसणी आणि छातीचे स्कॅनिंग केल्यानंतर छातीत एक हाड अडकले असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. यामुळेच जगमल यांच्या शारीरिक तक्रारीत वाढ होत असल्याचे निदान केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना शस्त्रक्रिया करून हाड काढण्याचा सल्ला दिला. गाजियाबादमधील मॅक्स सुपर स्पेशालिटी रुग्णालयात जगमल यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉक्टरांनी जगमल यांच्या छातीत गेल्या 2 वर्षांपासून अडकलेले हाड शस्त्रक्रिया करून काढले. आता जगमल यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.

जगमल यांच्यावर शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की, जगमल यांनी दुपारी जेवणाच्या वेळी चिकन खाल्ले होते. ही घटना 2021 साली घडली होती. यावेळी चिकनचे हाड त्यांच्या फुफ्फुसात अडकले. सुरुवातीला त्यांना या प्रकारामुळे कोणताही त्रास झाला नाही. त्यानंतर काही काळानंतर त्यांच्या फुफ्फुसात संसर्ग झाला. यामुळे छातीत कफ होऊ लागला. हळूहळू छातीतील कफाचे प्रमाण वाढू लागले. त्यानंतर त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. 10 जुलैला जगमल यांनी डॉक्टरांकडे तपासणी आणि इतर वैद्यकीय चाचण्या केल्यानंतर फुफ्फुसात अडकलेले हाड शस्त्रक्रिया करून काढण्यात आले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close