पावसाचा पाण्याने शेतजमिनी निघाल्या खरडुन
नुकनास भरपाईची शेतक-यांची मागणी.
वरूड/तूषार अकर्ते
येथुन जवळच असलेल्या मौजा ईसापुर उदापूर शेत शिवारातील शेतक-यांच्या शेतजमिनी पावसाच्या पाण्याने खरडुन निघाल्या आहे. या मुळे शेतातील उभी पिके, विहीरी, संत्रा, मोसंबी झाडे यांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.या शेतक-यांच्या शेताला लागून असलेल्या नाल्यावर सिमेंट चा कोल्हापुरी बंधारा बांधण्यात आला आहे. दि.१२ जुलै रोज शुक्रवार ला रात्रीला झालेल्या पावसाच्या पाण्याने या नाल्याला पूर येऊन हे पावसाचे पाणी नाल्यावर बांधलेल्या बंधा-याला अडल्याने हे पाणी या भागातील शेतक-यांच्या शेतामध्ये शिरून त्यांच्या शेतात असलेले उभे पिके, विहीर, संत्रा, मोसंबी ची झाडे खरडून वाहून गेली आहे. तसेच गुणवंत खाडे यांच्या शेतातील विहीर पूर्णपणे खचून गेली आहे. त्यामुळे त्यांनी शेतात झालेल्या नुकसानाची प्रशासनाने चौकशी करून झालेल्या नुकसानाचा अहवाल शासनाकडे पाठवावा व नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी तहसीलदार यांच्याकडे केली आहे. या बाबत निवेदन सुद्धा देण्यात आले आहे. यावेळी ऋषिकेश राऊत, हर्षल गलबले, नामदेव शेळके, प्रकाश शेळके, ज्ञानेश्वर खाडे, अमोल दंडाळे, सचिन बोंदरे, धर्मराज राऊत, चंद्रशेखर राऊत, केतन खाडे, आशिष भोंगाळे, भाऊरा दंडाळे, तसेच त्या शिवारातील आदि शेतकरी उपस्थित होते.