विदेश

रेल्वे स्टेशन खालून येत होता विचित्र आवाज जाऊन पाहिले तर …..

Spread the love

लंडन / नवप्रहार मीडिया नेटवर्क

               रेल्वे स्टेशन वर ट्रेन जातांना विविध आवाज येत असतात.  पण एक असं रेल्वे स्टेशन ज्याच्या प्लॅटफॉर्मखालून भयावह आवाज येत होता.

अखेर या रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मच्या खाली जाण्यात आलं, तेव्हा तिथं जे दिसलं ते पाहून सर्वांना घाम फुटला. लंडनमध्ये असलेलं हे रेल्वे स्टेशन. माय लंडन वेबसाईटची रिपोर्टर अॅना विलिस लंडनच्या मध्यभागी असलेल्या वॉटरलू रेल्वे स्टेशनवर गेली. तिथं अंडरग्राऊंड रूम होत्या.

तब्बल 16 खोल्या तिथं होत्या. या रूममध्ये ती गेली. स्टेशनचा हा सर्वात हंटेड भाग म्हणून ओळखला जातो. रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मखाली असलेल्या या ठिकाणाबाबत अनेकांना माहिती नाही.

अॅना म्हणाली, हा अनुभव अनोखा होता. ती जागा इतकी भीतीदायर होती की तिथून लवकरात लवकर बाहेर पडण्यासाठी सर्वजण धडपडत होते. जेव्हा आम्ही तिथं गेलो तेव्हा भिंतीतून लोकांचे हळुवार आवाज ऐकू येत होते. तिच्या अंगावर काटाच उभा राहिला. सुरुवातीला ती खूप घाबरली. तिच्यासोबत असलेल्या टूर गाईडने तिला ते आवाज खरे असल्याचं सांगितलं.

पण त्या आवाजांचं सत्य मात्र वेगळं होतं. भिंतीतून येणारे ते आवाज 175 वर्षे जुन्या स्टेशनखाली अडकलेल्या आत्म्याचे नाहीत. स्टेशनच्या पब्लिक अॅड्रेस सिस्टीमसाठी एक चाचणी किट तिथं ठेवली होती. त्यामुळे वरील घोषणांचे आणि गोंधळाचे आवाज ऐकू येत होते.

‘ अलीकडेच वॉटरलू स्टेशनला 175 वर्षे पूर्ण झाली आहेत. 1848 मध्ये जेव्हा ते उघडण्यात आलं. काही काळ या स्टेशनच्या आत सिनेमा होता.  मूळ स्टेशनची इमारत 1902 मध्ये कोसळली, ज्यामुळे वॉटरलूचा विस्तार झाला आणि नंतर 1941 मध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात ती इमारतही कोसळली

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close