दरोडा करण्याची तयारी करणाऱ्या आरोपीतांना अटक
प्रतिनिधी अमित वानखडे
पो.स्टे. रामटेक अंतर्गत १९ किमी अंतरावर सराखा बोर्डा शिवार येथे दिनांक ११/०७/२०२३ ते दिनांक :- १२/०७/२०२३ चे २२.३० वा. ते ००.३० वा. दरम्यान सराखा बोर्डा शिवारात एक संशयित ओमनी गाडी व मोटरसायकल उभी आहे. अशा मिळालेल्या गोपनीय माहीती वरुन पोलीस स्टेशन रामटेक येथील स्टाफ रवाना होवून सराखा बोर्ड शिवार येथे अस्मिता ऑर्गेनिक फार्मच्या मागे शेत शिवारात जावून पाहणी केली असता काही ईसम एक झुडपाचे मागे लपून बसलेले दिसले त्यांना आवाज दिला असता ते पळून जाण्याचा प्रयत्न करु लागले. त्यांचा पाठलाग केला असता १) चितामणी हरी मेहर, वय ३५ वर्ष, २) मिथुन हरी मेहर, वय ३२ वर्ष दोन्ही रा. सालई हिवरा बाजार ता. रामटेक ३) प्रणय ललीत दखने, वय २१ वर्ष रा. मामा चेक गोंविदपूर गोंदिया ४) राजकुमार दुर्जन कालसर्पे वय २२ वर्ष, रा. बाजार चौक गोरेगाव जि. गोंदिया हे मिळून आले व ०२ ते ०३ फरार इसम नामे – १ ) राहुल राउत, वय अंदाजे २३ वर्ष रा. मुंडिपार गोरेगाव ता. गोरेगाव जि. गोदिया २) अविनाश मरकाम, वय २५ वर्ष रा. सालई हिवरा बाजार ता. रामटेक ३) इंद्रराज उर्फ आय. जी. सलामे अंदाजे वय ४२ वर्ष रा. सालई हिवरा बाजार ता. रामटेक हे इसम अंधाराचा फायदा घेवून तेथून पळून गेले आरोपी क्र. १ ते ४ च्या ताब्यातुन एक गोल्डन रंगाचा व्हिवो कंपनीचा मोबाईल किंमती अंदाजे ७०००/- रु. व त्याचे हातात एक कॅरीबॅग मध्ये लाल रंगाची मिरची पावडर अंदाजे ५०० ग्रॅम किंमती अंदाजे ५०/- रु. ची एक लाकडी दांडा किंमती अंदाजे २०/- रु. एक निळया रंगाचा रेडमी मोबाईल किंमती अंदाजे ६००० /- रु. एक चाकु किंमती अंदाजे २०० /- रु., एक लोखंडी रॉड किंमती अंदाजे ५०/- रु. असे पंचासमक्ष जप्त करण्यात आले. तसेच घटनास्थळावर मिळून आलेले एक ओमणी कार जिचा क्र. एम. एच. – ३१ / बी.बी.- ५९३९ किंमती अंदाजे १,५०,००० /- रु. होंडा अॅक्टीव्हा मोपेड क्र. एम. एच.- ३५ / ए.डी. – ४६०७ किंमती अंदाजे ४०,०००/- रु. होंडा शाईन मोटरसायकल क्र. एम. एच. ४० / बी. वाय. -८१८९ किंमती अंदाजे ५०,००० /- रु. यामाहा सिग्रस झेडआर मोपेड क्र. एम. एच. – ४० / बी. क्यू. – १०५६ किंमती अंदाजे ३५,००० /- रु. बजाज डिस्कव्हर मोटरसायकल क्र. एम. एच. – ३५ / डब्लू- ४००३ किंमती अंदाजे ४०,००० /- रु. हिरो सी. डी. डिलक्स मोटरसायकल क्र. एम. एच. – ३१ / सी.यु. – ५७८७ किंमती अंदाजे ३५,००० /- रु. असा एकुण ३,६३,३२० /- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.