अंजनगावात भाजपाचे विशिष्ठ व्यक्ती परिचय व चर्चा अभियान
अंजनगाव सुर्जी ( मनोहर मुरकुटे)
माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या कार्यकाळाला ९ वर्ष पूर्ती निमित्य “जनसंपर्क से जनसमर्थन” , सेवा सुशासन आणि गरीब कल्याण 9 वर्ष पूर्ती ह्या कार्यक्रमाचे आयोजनानुसार मा नरेंद्र मोदी सरकारने गेली नऊ वर्षात देशातील गरीब जनतेसाठी गरीब कल्याण अन्न योजना, प्रत्येक घरापर्यंत नळाचे पाणी, 370 कलम हटविले ,गरिबांसाठी जन,धन खात्यांची सुविधा ,किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये ची मदत, पीक विमा, किसान क्रेडिट कार्ड द्वारे शेतकऱ्यांना मदत, कृषी सिंचाई अंतर्गत शेतकऱ्यांना लाभ, आर्थिक दुर्बल घटकांपर्यंत असलेल्या लोकांना नोकऱ्या, 390 नवीन व्हीध्यापिठे, व 7 आय आय टी कॉलेज ची स्थापना, कौशल्य विकास योजनेअंतर्गत युवक प्रशिक्षित, गरीब महिलांसाठी उज्वला गॅस योजना, मातृ वंदना योजना, आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत मोफत रोग निदान व उपचार, जनौषधी केंद्रावर स्वस्त दरात औषधी उपलब्ध, मध्यमवर्गीय लोकांना सर्व सुख सोई युक्त अश्या विविध योजनेची माहिती ही प्रत्येक घरापर्यंत पोहचली पाहिजे तसेच शहरातील प्रत्येक प्रभागातील काही विशिष्ट व्यक्तीची भेट घेऊन त्यांचेशी हितगुज करणे तसेच पक्षाचे व्यतिरिक्त इतरही पक्षातील लोकांची भेट घेऊन त्यांना नऊ वर्ष पूर्ती कार्यक्रमाचे उद्दीष्टये समजावून सांगण्याचे अभियान नुकतेच अंजनगाव सुर्जी येथे राबविण्यात आले ह्यासाठी जिल्हा महामंत्री राजेशजी पाठक, युवा मोर्चाचे मनीष मेन, सरचिटणीस राजेंद्र रेखाते, माजी जिल्हा ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष मनोहर मुरकुटे , सरचिटणीस राजेंद्र रेखाते, प्रवीण पटूकले , विनोद दुर्गे, अविनाशजी देशपांडे, अविनाश पवार, मनोज श्रीवास्तव, धीरज भागवतकर, गजेंद्र अडगोकर, निखिल श्रीवास्तव, पंकज श्रीवास्तव,इ कार्यकर्ते पदाधिकारी ह्यावेळी उपस्थित होते , केंद्र शासनाच्या वतीने राबिविण्यात आलेल्या योजनांचे सर्वत्र कौतुक होत आहे