शेती विषयक

वरूड तालूक्यातील पाच मंडळात अतिवुष्टी

Spread the love

वरूड/तूषार अकर्ते

वरूड तालुक्यात गुरुवारी १३ जुलैला सकाळी १० वाजेपर्यंत झालेल्या २४ तासांत सात महसुली मंडळांपैकी पाच मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे.तालुक्यातील ६९ हेक्टर जमीन खरडून गेली असून २६ घरांची पडझड झाली आहे. अतिवृष्टीची नोंद झालेल्या मंडळांमध्ये वरूड ८५.८ मि.मी.शेंदूरजनाघाट ६६ मि.मी.पुसला ७५.५ मि.मी., वाठोडा ७५.५ मि.मी., राजुरा ७६.८ मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यातील अन्य दोन मंडळांमध्ये बेनोडा मंडळामध्ये ५६.८ मि.मी.तर लोणी मंडळामध्ये ३९.८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यात गेल्या २४ तासांत सरासरी ६८ मि.मी. पाऊस झाला आहे. १२ जुलैच्या सकाळ पासून १३ जुलैच्या सकाळ पर्यंत जिल्ह्यात सरासरी १८.८ मि.मी. पाऊस झाला असून विक्रमी पावसाची नोंद वरूड तालुक्यात झाली आहे. मुसळधार पावसामुळे तालुक्यातील ६९ हेक्टर जमीन खरडून गेली असून तूर, सोयाबीन व कापसाच्या पिकाचे नुकसान झाले आहे. २६ घरांची पडझड झाली आहे. तालुका प्रशासनाने जिल्हा प्रशासनाकडे हा अहवाल पाठविला आहे.अहवालानुसार पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close