विदेश

आता तर हद्दच झाली ….! बायकोची हत्या करुन खाल्ला मेंदू 

Spread the love

मेक्सिको / नवप्रहार मीडिया नेटवर्क

             नशेत माणूस काय करेल याचा नेम।नसतो. नशेत त्याची माणुसकी शेण खायला जाते की काय ? हा प्रश्न पडतो.मेक्सिको मध्ये घडलेल्या एका भयंकर घटनेमुळे तर हद्दच झाली आहे. एका नवऱ्याने बायकोची हत्या करून चक्क तिचा मेंदू खाल्ल्याचा किळसवाणा प्रकार समोर आला आहे.

अल्वारो असं या व्यक्तीचं नाव आहे. २९ जून रोजी नशेत असताना त्याने आपल्या पत्नीची हत्या केली. सँता म्युएर्ते (मृत्यू देवता) आणि सैतानाने आपल्याला हे करण्याची सूचना दिली, असं या व्यक्तीने पोलिसांना सांगितले. हत्या केल्यानंतर या व्यक्तीने आपल्या बायकोचे तुकडे करुन प्लास्टिक बॅगमध्ये ठेवले होते.

अवघ्या एका वर्षापूर्वीच अल्वारो आणि मारिया मॉन्टसेराट यांचं लग्न झालं होतं. मारियाला आधीपासूनच पाच मुली होत्या. यातील सर्वात लहान १२ वर्षांची, तर सर्वात मोठी मुलगी २३ वर्षांची आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर तिच्या मेंदूचा काही भाग आपण टाकोजमध्ये टाकून खाल्ल्याचं या व्यक्तीने सांगितलं. सोबतच, तिच्या कवटीचा वापर अ‍ॅशट्रे म्हणून केल्याचंही अल्वारोने मान्य केलं. हत्येनंतर दोन दिवसांनी या व्यक्तीने आपल्या एका सावत्र मुलीला फोन करून याबाबत माहिती दिली.

“तुम्ही येऊन आपल्या आईला घेऊन जा, मी तिला मारून बॅगेत भरुन ठेवलं आहे” असं अल्वारोने फोनवर सांगितलं होतं. मारियाची आई सेरन यांनी याबाबत माहिती दिली. “त्याने कोयता, छन्नी-हातोड्याने माझ्या मुलीचे तुकडे केले. त्याने नक्कीच ड्रग्स घेतले असणार. त्याशिवाय असं कृत्य करणं शक्यच नाही..” असं त्या म्हणाल्या.

अल्वारो आपल्या सावत्र मुलींना मारहाण देखील करत होता. पोलिसांना तपासावेळी अल्वारोच्या घरात जादूटोणा करण्याचं साहित्य देखील आढळल्याची माहिती समोर आली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close