हटके

पार्टीला आले, बाळाला गाडीतच विसरले अन घडलं अघटित

Spread the love

नवी दिल्ली / नवप्रहार मीडिया नेटवर्क 

                           आई वडील म्हटले की त्यांना आपल्या बाळाची खूप काळजी असते. मुख्यतः आई ही बाळाला थोडंस काही जरी झालं तर त्याची चार दा विचारपूस करते. कारण आईने त्याला 9 महिने आपल्या गर्भात वाढवले असते. तिला त्या काळात काय काय वेदना सोसाव्या लागतात त्याचे तिलाच माहीत.आणि याच कारणामुळे ती बाळाला तळहाताच्या फोड्याप्रमाणे जपत असते. पण एखाद्या कार्यक्रमाच्या घाईगडबडीत अभिभावक मुलाकडे लक्ष देऊ शकत नाही. हे एखाद्या वेळेस घडू शकते. पण तुम्ही बाळाला जर कार मध्ये , किंवा अन्य खेळण्याच्या ठिकाणी विसरला तर त्याला हलगर्जीपणा असेच म्हणावे लागेल. आणि याच हलगर्जी पणामुळे एका दाम्पत्याला आपल्या 18 महिन्याचा बाळाला गमवावे ओगले आहे.

                   घटना अमेरीकेच्या  कॅलिफोर्नियातील पोक कौंटी मधील आहे. जोएल आणि जॅझमिन रोन्डोन नामक दाम्पत्य आपल्या 3 मुलांसह 4 जुलैला अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आयोजित पार्टीला गेले होते. यावेळी त्यांचे 18 महिन्यांचे बाळ कारमध्येच विसरून गेले होते. रात्री 3 वाजल्यापासून सकाळी 11 वाजेपर्यंत बाळ कारमध्येच राहिले होते. यादरम्यान बाहेरील तापमान खूप वाढलेले. या उष्णतेमुळे बाळाचा मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले. तपासणीनंतर रोन्डोन पती-पत्नी दोघेही अमली पदार्थांच्या आहारी गेले होते, असे निष्पन्न झाले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close