बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार, १५ दिवसातच रस्ता उखडायला सुरवात
वरूड/तूषार अकर्ते
शेंदूरजनाघाट ते वरूड मार्गे जाणा-या बाहुली रस्त्यावरील अवघ्या ७०० मिटरचे बांधकाम नुकतेच १५ दिवसा आधी शे.घाट नगरपरिषद अंतर्गत डांबरीकरण करण्यात आले आहे. इतक्या कमी कालावधीत या रस्त्यावर खड्डे पडत असल्याने या बांधकामावर प्रश्न चिन्ह निर्माण करण्यात येत आहे.या रस्त्यावर डांबरीकरणाचे काम सुरु असताना होत असलेले काम हे इस्टीमेट नुसार होत नसुन नित्कूष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप माजी नगरसेवक भुपेंद्र कुवारे यांनी केला होता.व तत्कालीन न.प.अभियंता शरद खाडे यांच्या लक्षात सुद्धा आणुन दिला होता. न.प.बांधकाम विभागातील कर्मचा-यांशी सुद्धा वारंवार यासंदर्भात फोनवर बोलुन या कामामध्ये सुधारणा करावी अशी मागणी करण्यात आली होती. परंतु न.प.कर्मचारी यांनी ठेकेदाराच्या प्रेमापोटी या कडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले. न.प.अभियंता तर हा न.प.चा ठेकेदार असल्याची खंत निर्माण झालेली दिसून आली. झालेले काम हे इस्टीमेट नुसार झाले नसल्याने त्या कामाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्रेयस्त एजंसी कडून चौकशी करण्यात यावी असे पत्र शिवसेनेचा वतीने नगरपरिषद तसेच जिल्हाधिका-यांना देण्यात आले होते. परंतु आतापर्यंत न.प.कडुन कोणतीही करवाही संबधित ठेकेदारावर केलेली दिसुन आली नाही.आता सुद्धा फक्त ठेकेदाराचे बिल कसे काढता येईल याकडे जास्त लक्ष दिले जात आहे. सदरील कामाच्या इस्टीमेटला फक्त डांबरी रस्ताच दिला होता. परंतु या कामामध्ये कॉक्रीटचा उल्लेख कुठेही नसताना देखील एक कॉक्रीट रपटा टाकण्यात आला आहे. त्यामुळे या कामामध्ये मोठया प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे पत्र कूवारे यांनी शे.घाट नगरपरिषदेला व जिल्हाधिका-यांना दिले आहे. अशा बोगस पद्धतीने झालेल्या कामाची पाहणी करून ठेकेदारावर व न.प.मधील सबंधित कर्मचा-यांवर कारवाई कधी होणार असा प्रश्न या वेळी उपस्थित केला आहे.न.प.अंतर्गत होत असलेल्या कामात मनमानी कारभार सध्या चालत असल्याने झालेल्या कामाची चौकशी होने गरजेचे आहे. शासनाने दिलेला पैसा हा योग्य ठिकाणी व योग्य त्या प्रमाणातच खर्च व्हायला पाहिजे परंतु असे न करता सर्व बोगस पद्धतीने कामे सुरू असुन शासनाने दिलेला पैसा उधळण्याचे काम नगरपरिषद करत असल्याचे दिसून येत आहे. अशा गोष्टीमुळेच झालेल्या कामात पारदर्शकता दिसुन आली नाही.त्यामुळेच हा रस्ता खराब झालेला दिसत आहे असा आरोप ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमूख तथा माजी नगरसेवक भूपेंद्र कूवारे यांनी केला आहे.