सामाजिक
नगर परिषद उर्दु शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत
घाटंजी तालुका प्रतिनीधी-सचिन कर्णेवार
घाटंजी :- नगर परिषद उर्दु शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेशित विद्यार्थींचे स्वागत करण्यात आले
उन्हाळ्याच्या सुट्टी नंतर शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेत जाण्याचा आनंद मुलांच्या चेहऱ्यावर झळकत होता .नव्या कोर्या वह्या अन् नवी कोरी पाटी ,शाळेत जाऊन होतील मित्राच्या भेटी गाठी ! यानुसार शाळेत येताच मित्राच्या झालेल्या भेटी गाठी.शिक्षकांनी पुष्प गुच्छ देऊन केलेले स्वागत आणि सोबतच मिळालेली नवी कोरी पुस्तके .यामुळे चिमुकल्याच्या उत्साहात भर पडली नगर परिषद उर्दु हाय स्कूल चे मुख्याध्यापक अतहर हुसेन जेष्ठ शिक्षक जमील खान जेष्ठ शिक्षिका नजमा काझी ने पुष्प गुच्छ देऊन विध्यार्थीचे स्वागत केले.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1