परिचारिका आणि रुग्णाचा रोमान्स सुरू असताना घडलं भलतच

इंग्लंड / नवप्रहार मीडिया नेटवर्क
प्रेम कोणासोबत केव्हाही आणि कसेही होऊ शकते. प्रेमाला मर्यादा नसतात. न जाती पातीचे बंधन असते ना वयाचे. दोघांचा एकमेकांवर जीव आला की बस्स झालं ! मग ते कुठलीही फिकर करत नाही. अशीच घटना इंग्लड मध्ये घडली आहे. येथे एका परिचरिकेचा (नर्स) चा रुग्णावर जीव जडला. आणि त्यांच्यात रोमान्स सुरू झाला. वास्तविक हे त्या रुग्णालयाच्या नियमांच्या विरोधात होते. पण शेवटी त्यांना थांबवणार कोण ?
पेनेलोप विलियम्स असं नर्सचं नाव आहे. 2019 पासून पेनेलोप ही नॅशनल हेल्थ सर्व्हिस रुग्णालयात नर्स म्हणून काम करते. काही दिवसांपूर्वी या रुग्णालायत एक रुग्ण उपचारांसाठी दाखल झाला. या रुग्णावर नर्स पेनेलोप हिचा जीव जडला. दोघंजण भेटू लागले, कॉल, मेसेवर वर त्यांच्या गप्पा रंगू लागल्या. इतकंच काय अनेकवेळा दोघंजण हॉस्पीटलच्या पार्किंगमध्येही भेटत होते.
घटनेच्या दिवशी दोघंही असेच सगळ्यांची नजर चुकवून हॉस्पीटलच्या पार्किंगमध्ये एका कारमध्ये रोमान्स करत होते. यावेळी अचानक रुग्णाला हार्टअटॅक आला. रुग्णाची अवस्था पाहून पेनेलोप घाबरली. भीतीने तीने ही गोष्ट कोणालाही सांगितली नाही. त्यामुळे उपाचाराअभावी रुग्णाचा कारमध्येच मृत्यू झाला. रुग्णाचा मृत्यू झाल्याचं पाहातच पेनेलोपने आपल्या एका सहकाऱ्याला बोलवून त्याला CPR देण्यास सांगितलं. पण तोपर्यंत उशीर झाला होता.
हे प्रकरण हॉस्पीटल प्रशासनानेपर्यंत पोहोचलं. हॉस्पीटल प्रशासनाने कठोर भूमिका घेत नर्स पेनेलोपला नोकरीवरुन निलंबित केलं. तसंच तिच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्या रुग्णाने आपल्याला फेसबूक मेसेज करुन भेटायला बोलावलं, गप्पा मारत असताना असताना अचानक त्याच्या छातीत दुखू लागलं, असा दावा पेनेलोपने पोलिसांसमोर केला. पण तपासाअंती हा दावा खोटा ठरला.
पेनेलोपचा मोबाईल तपासला असता तीनेच रुग्णाला भेटायला बोलावल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर दोघांनी कारमध्ये संबंध ठेवले. यादरम्यानच त्याला हार्टअटॅक आला आणि यातच त्याचा मृत्यू झाला. याआधीही दोघं रिलेशनशिपमध्ये होते असा खुलासा झाला आहे. पण पेनेलोपणे शरीरसंबंधांचा इन्कार केला आहे. याप्रकरणी हॉस्पीटल प्रशासनाने एक तपास समिती स्थापन केली आहे. हॉस्पीटलच्या नियमांविरोधात जाऊन नर्सने केलेल्या कृत्यांबाबत कठोर कारवाई केली जाणार असल्याचं हॉस्पीटल प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.