हटके

चोर समजून उघडले दार समोर जे दिसले ते पाहून दरदरून फुटला घाम 

Spread the love

नाविदिल्ली / नवप्रहार न्यूज नेटवर्क

                            नवविवाहित कपल बेडरूम मध्ये झोपले होते. त्यांना मध्यरात्री नंतर  बाजूच्या रूम मधून आवाज ऐकू येऊ लागला. पहिले त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. पण सतत आवाज येत असल्याने तरुणाने हिम्मत करत हातात पिस्तुल घेऊन दार उघडले. समोर त्याने जे पाहिले ते पाहून त्याला दरदरून घाम फुटला. त्याने पोलिसां ऐवजी वनविभागाला फोन केला. वाचा नेमके त्याने असे काय पाहिले.

घटना अमेरिकेतील लुसिआना येथील आहे. येथे राहणाऱ्या एका  जोडप्याच्या बेडरूम शेजारच्या रुम मध्ये आवाज येत असल्याने त्या जोडप्याला अस वाटलं, की आपल्या घरात चोर शिरले आहेत. जेव्हा त्यांच्या घरात मध्यरात्री काहीतरी आवाज ऐकू आला. चोरीच्या उद्देशाने कोणीतरी चोरटे घरात घुसले असावेत, असं त्यांना वाटले. पण वास्तव काही वेगळंच होतं.

ही घटना 24 जूनची आहे. मध्यरात्री या जोडप्याच्या पाळीव कुत्र्याने जोरजोरात भुंकायला सुरुवात केली. त्यांच्या घरात चोर घुसल्याचं दाम्पत्याला वाटलं. हिंमत एकवटून नवऱ्याने खोलीत ठेवलेलं पिस्तूल काढलं आणि चोराला सामोरे जाण्याचं ठरवलं.मात्र बाहेर येताच वेगळंच काहीतरी दिसलं. तिथे चोर नसून पाच फुटांचा मृत्यू पाहून तो हादरला. होय, त्यांच्या घरात पाच फुटांची मगर घुसली होती. डॉनने सांगितलं की, या मगरीने कुत्र्याच्या दारातून घरात प्रवेश केला होता.

संपूर्ण हॉलमध्ये ती आरामात फिरत होती. डॉनला मगरी दिसताच त्याने तत्काळ Fish and Wildlife Department ला फोन केला. काही वेळातच टीम आली आणि मगरीला पकडून घेऊन गेली. अंधारात घरातून आवाज येत असल्याने डॉनची पत्नी चांगलीच घाबरली होती. ती खोलीतून बाहेरही आली नाही. डॉन एकटाच पिस्तुल घेऊन बाहेर पडला. मात्र तिथे चोराऐवजी मगर दिसल्याने त्याला आश्चर्य वाटलं. सुदैवाने या मगरीने कोणावरही हल्ला केला नाही.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close